Aurangabad news
Aurangabad news  
छत्रपती संभाजीनगर

पैशे सांभाळा... कारण या बॅंकेला १५ जणांनी लावलाय चुना

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : एचडीएफसी बँकेच्या कोकणवाडीच्या शाखेची आतापर्यंत १५ व्यक्तींनी फसवणूक केल्याचे आणि साखळी पद्धतीने हा गुन्हा करण्यात आल्याचे पोलिस तपासातून निष्पन्न झाले आहे.

या प्रकरणात एचडीएफसी बँकेचे उपाध्यक्ष फ्रान्सिस आयवन क्रियाडो (पुणे) यांनी दुकान परवाना, आयकर विवरण पत्र, बँक खाते उतारे आदी बनावट कागदपत्रांच्या आधारे व्यावसायिक कर्ज घेऊन बॅंकेची फसवणूक केल्याची तक्रार वेदांतनगर पोलिस ठाण्यात दिली आहे. 

या प्रकरणात वेदांतनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन संशयित आरोपी प्रभाकर गावंडे याला पोलिसांनी अटक केली तर, न्यायालयाने गावंडेला शुक्रवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. पोलिस कोठडीची मुदत संपल्यामुळे आरोपी गावंडेला शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात आले.

सुनावणीवेळी, १५ आरोपींनी बनावट कागदपत्रे व शिक्क्यांचा वापर करुन बँकेची फसवणूक केल्याचा केली सून गावंडेने १४ लाख रुपये बँकेतून उचलले आहेत व सर्व आरोपींनी साखळी पद्धतीने गुन्हा केल्याचे दिसून येत आहे असा युक्तीवाद करण्यात आला. सुनावणीदरम्यान आरोपी गावंडेच्या पोलिस कोठडीमध्ये रविवारपर्यंत (ता.२३) वाढ करण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए. ए. काळे यांनी दिले. 

आहेत संशयित 

मंगेश पंढरीनाथ सिरसाठ (रा. खडकेश्वर), महेश पंढरीनाथ सिरसाठ (रा. शिवनेरी हौसिंग सोसायटी), सचिन बंडुलाल राठोड (रा. गारखेडा), सय्यद जाविद (निकलक, ता. बदनापूर, जि. जालना), मुस्तकीम निसार खान (पीरबाजार रोड), मीना सुभाष औताडे (रा. बजाजनगर), सविता गुलाब हिवर्डे (रा. शरणापूर, पडेगाव), संतोषकुमार बबनराव पाटील (देवळाई परिसर), वाजिद अली खान (रा. सिल्कमिल कॉलनी), मालती राजेंद्र हार्डे (रा. हिवरखेडा रोड, कन्नड, जि. औरंगाबाद), प्रभाकर मधुकर गावंडे (४९, रा. चिकलठाणा), दिनेश बेचारा वाविया (रा. सातारा परिसर), शेख निहाल अहेमद हाजी (रा. किराडपुरा), हसन अमर हैदरा (रा. रोशनगेट) व फकरोद्दीन मोहम्मद (रा. बिस्मिल्ला कॉलनी) यांनी बँकेच्या कोकणवाडी शाखेची एक कोटी ४७ लाख २० हजार रुपयांची फसवणूक केल्याचे फिर्यादी म्हटले आहे.

मास्टर माईंड मोकाटच 

मागच्या वर्षीही ७ व्यक्तींनी बँकेची फसवणूक केल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. त्यामुळे या प्रकरणात आरोपींची मोठी साखळी असू शकते. आरोपी गावंडेने बनावट शिक्के-कागदपत्रे कुठून मिळवले, कुणी दिले, गुन्ह्याचा मास्टर माईंड कोण आदी बाबींचा तपास करणे बाकी असून, बनावट शिक्के-कागदपत्रे जप्त करणे बाकी असल्याचेही न्यायालयात सांगण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, KKR vs SRH: कोण गाठणार फायनल? कोलकता-हैदराबादमध्ये रंगणार ‘क्वॉलिफायर वन’चा थरार

Pune Porsche Car Accident : ''जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून मी घटनास्थळावर पोहोचलो अन्...'', आमदार टिंगरेंनी अपघाताबद्दल आरोपावर स्पष्टच सांगितलं

Beed Bogus Voting : ''बोगस वोटिंग प्रकरणात कठोर कारवाई करा'' बीडच्या प्रकरणात शरद पवारांनी घातलं लक्ष

Nashik Crime News: आयुक्तालय हद्दीत आचारसंहिता भंगचे 7 गुन्हे! विविध पोलीस ठाण्यांमध्ये अदखलपात्र गुन्हे दाखल

Julian Assange : 'विकीलिक्स'चे संस्थापक असांज यांना लंडनमधील कोर्टाचा मोठा दिलासा! प्रत्यार्पणाला देता येणार आव्हान

SCROLL FOR NEXT