Chhatrapati Sambhajinagar Monsoon MSRTC Transport Sakal
छत्रपती संभाजीनगर

Chh. Sambhajinagar ST Update : पावसाळ्यात पुरामुळे एसटीला कुठेही थांबावे लागणार नाही

Chhatrapati Sambhajinagar Monsoon MSRTC Transport : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आढळले नाही एकही धोकादायक स्थळ

सकाळ वृत्तसेवा

Chhatrapati Sambhajinagar : पावसाळ्यात अनेक ठिकाणी पुरामुळे वाहतूक थांबणे किंवा पुलावरून पाणी वाहणे अशा स्वरूपाच्या धोकादायक स्थळांवर काही काळ एसटीची वाहतूक थांबविण्यात येते. मात्र, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अशा स्वरूपाचे एकही धोकादायक स्थळ नसल्याची माहिती विभागीय वाहतूक नियत्रंक अधिकारी पंडित चव्हाण यांनी दिली.

पावसाळ्यापूर्वी धोकादायक स्थळाची माहिती संकलित करण्याचे काम एसटी महामंडळाने हाती घेतले होते. कमकुवत पुल, पुलावरून पाणी वाहण्याची शक्यता, कच्चे रस्ते, रस्ता खचण्याची शक्यता, त्याच बरोबर धोकादायक वळणे आदींची माहिती घेण्यात आली. अशा संभाव्य ठिकाणी अपघात होेऊन आपत्कालीन परिस्थिती निर्माण होणार नाही आणि अशी घटना घडलीच तर काय उपाययोजना कराव्यात याबाबत आढावा घेण्यात आला.

आपल्या जिल्ह्यात पावसामुळे एसटी बसला धोका पोचेल, असे अपघातप्रवण अथवा धोकादायक ठिकाण नाही. तरीही कुठेही पुलावरून पाणी वाहत असेल तर बस चालकांने बस पुढे घेऊन जाऊ नये किंवा कच्च्या रस्त्यावरून बस सुरक्षित व हळुवारपणे चालवावी अशा सूचना दिलेल्या आहेत.

- पंडित चव्हाण, विभागीय वाहतूक अधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nursing Student Case : आई-वडील घरी येताच समोर आला धक्कादायक प्रकार; 20 वर्षीय पायलचा दुर्दैवी शेवट, 'नर्सिंग'चे घेत होती शिक्षण

तेजश्रीला लागलं नव्या ट्रेंडचं वेड, सोशल मीडियावर 3D फोटोची भलतीच क्रेझ, फोटो व्हायरल

Solapur Crime : नर्तकी असलेल्या प्रेयसीने भेट न दिल्याने माजी उपसरपंचाने गोळी झाडून संपविले जीवन; नर्तकीविरुद्ध गुन्हा दाखल

Fake Job Scam : बोगस नोकरीची मुलाखत चक्क मंत्रालयात, नागपुरातील तरुणाकडून लाखो रुपये उकळले...धक्कादायक प्रकरण समोर!

Navid Mushrif : नविद मुश्रीफांना शौमिका महाडिकांनी म्हटलं पळपुटे; बहीण-भावाच्या नात्यात दुरावा?

SCROLL FOR NEXT