sambhaji nagar  sakal
छत्रपती संभाजीनगर

Sambhaji Nagar News : गरीब कर्करुग्णांना ''पेट स्कॅन'' तपासणी शुल्क आवाक्याबाहेर ; तपासणी शक्य होत नसल्याबाबत ‘सकाळ’ने केले वृत्त प्रकाशित

‘सकाळ’च्या वृत्तानंतर घाटीची भूमिका, आठवडाभरात शासनाला पाठविणार प्रस्ताव

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : शुल्क आवाक्याबाहेर असल्याने गरीब कर्करुग्णांना ''पेट स्कॅन'' तपासणी शक्य होत नसल्याबाबत ‘सकाळ’ने वृत्त प्रकाशित केले होते. याची दखल शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (घाटी) वतीने घेण्यात आली. त्यानुसार ‘पेट स्कॅन’ प्रस्ताव आठवडाभरातच शासनाकडे मंजुरीसाठी पाठवला जाणार आहे.

शासकीय कर्करोग रुग्णालयात मराठवाड्यासह इतर दहा अशा एकूण १८ जिल्ह्यांतील रुग्ण उपचारासाठी येतात. स्त्री आणि पुरुष दररोज अशा साधारण अडीचशे रुग्णांची नोंद बाह्यरुग्ण विभागात होते. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, कर्करोग झालेल्या रुग्णांपैकी ९० टक्के रुग्णांचे ‘पेट स्कॅन’ करणे आवश्यक असते. यामुळे रुग्णाच्या शरीरात कर्करोग कुठपर्यंत पसरला हे स्पष्ट होते. यावरच पुढील उपचारपद्धती ठरते. परंतु या तपासणीचे शुल्क तब्बल १५ हजार रुपये असल्याने, यातील केवळ ३० टक्के रुग्णच ही तपासणी करतात. उर्वरित रुग्ण सिटी स्कॅनसारखी चाचणी करून उपचार सुरू करतात. याबाबत ‘सकाळ’ने ६ जानेवारी रोजी वृत्त प्रकाशित केले होते.

सध्या कर्करोग रुग्णालयात पीपीपी तत्त्वावर पेट स्कॅन सुरू करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आलेला आहे. परंतु, आता पीपीपी तत्त्वाऐवजी रुग्णालय प्रशासनच शासनाकडून निधी मिळवून माफक दरात ही सुविधा उपलब्ध करून देणार आहे. त्यासाठी पुढील आठवड्यात हा प्रस्ताव शासनाकडे पाठवला जाणार आहे.

कर्करोग रुग्णांसाठी ही तपासणी आवश्यक आहे. यामुळे पुण्यातील ससून रुग्णालयाच्या धर्तीवर अद्यावत असे ‘पेट स्कॅन’ कर्करोग रुग्णालयाला उपलब्ध करून दिले जाणार आहे. अंदाजे ३० ते ३५ कोटी रुपयांचा यासाठी खर्च येईल. स्थानिक लोकप्रतिनिधींच्या सहकार्याने ही प्रक्रिया सुरू असून, पुढील आठवड्यात प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात येईल.

— डॉ. शिवाजी सुक्रे,

अधिष्ठाता, घाटी रुग्णालय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SA 5th Test: शुभमन गिलची पाचव्या सामन्यातून माघार; Sanju Samson ला आता तरी मिळेल जागा, की गौतम गंभीर करेल प्रयोग?

Child Rappelling Kokankada : शिवरायांची वाघीण! कोकणकड्यावरून चिमुकलीचं थरारक रॅपलिंग; महाराष्ट्रातील सर्वात कमी वयाची आद्याश्री तरी कोण?

Latest Marathi News Live Update : नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाला बॉम्ब धमकी; बॉम्बशोध पथक व डॉग स्कॉडकडून कसून तपास

Kolhapur Municipal : गुन्हेगारीचा थेट प्रवेश; महापालिका निवडणुकीत गुंड-मटकेवाल्यांची बायकांसाठी उमेदवारीची धडपड

Mutual Fund Rule: मोठी बातमी! म्युच्युअल फंड आणि स्टॉक ब्रोकर्ससाठी नियम बदलले, सेबीचा ऐतिहासिक बदल

SCROLL FOR NEXT