crime news  sakal
छत्रपती संभाजीनगर

Crime News : मुलाचे भांडण सोडवायला गेलेल्या आईच्या डोक्यात घातला दगड

सकाळ डिजिटल टीम

छत्रपती संभाजीनगर : घरासमोर राहणाऱ्या कुटुंबाने एका युवकाला चाकूच्या धाकाने मारहाण केली तर ही घटना दिसताच भांडण सोडविण्यासाठी मध्ये पडलेल्या आईच्याही डोक्यात दगड घालून गंभीर जखमी केल्याची घटना घडली. याप्रकरणी तिघांविरोधात सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना १४ एप्रिलला राहुलनगर परिसरात घडली.

दीपक थोरात, सुशीला दीपक थोरात आणि अनिल बनसोडे (रा.तिघेही राहुलनगर) अशी त्या मारहाण करणाऱ्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी शोभाबाई विठ्ठल वाटोडे (६०, रा.राहुलनगर, गल्ली क्र.५) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्या नातवासह राहुलनगर परिसरात डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त आयोजित मिरवणूक पाहत होत्या. त्याचदरम्यान काही वेळाने घरी जाताना मोठा मुलगा सुधाकर वाटोडे याला घरासमोरील दीपक थोरात हा चाकूचा धाक दाखवून पत्नी सुशीला आणि मेहुणा अनिल बनसोडे हे मारहाण करीत होते.

दरम्यान, शोभाबाई या भांडण सोडविण्यासाठी गेल्या असता, सुशीलाबाईने वृद्धेच्या डोक्यात दगड घातला. दरम्यान मिरवणुकीच्या बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलिसांनी धाव घेत भांडण सोडविले. याप्रकरणी दीपक, त्याची पत्नी सुशीलाबाई आणि त्याचा मेहुणा अनिल बनसोडे विरोधात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास हवालदार अकोले करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who was Sandu Karhale? : मराठवाडा मुक्ती संग्रामातील धगधगता तारा हरपला! ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक सांडू कऱ्हाळे यांचे वयाच्या 100 व्या वर्षी निधन, निल्लोडवर शोककळा

Gold Silver Price : सोने-चांदी झाले स्वस्त; एका दिवसात सोने ५ हजारने तर चांदी ४ हजार ९०० रुपयांनी घसरली

Latest Marathi News Update : मुंबईतील ताज हॉटेलला बॉम्बने उडवून देण्याची धमकी

Fatty Liver: भारतात झपाट्याने वाढतोय फॅटी लिव्हरचा धोका! अशी ओळखा लक्षणे...

What Action Will Tukaram Mundhe Take? बनावट दूध पावडरचे मोठे रॅकेट अन् अधिकाऱ्यांचे हात गुंतल्याचा संशय; सिन्नरमधील 'त्या' घोटाळ्याची मुंढेकडे लेखी तक्रार, काय कारवाई होणार?

SCROLL FOR NEXT