Aurangabad News 
छत्रपती संभाजीनगर

औरंगाबादकरांनो, खबरदार! आता घराबाहेर पडायचेच नाही : फळ खरेदीची सुटही रद्द

राजेभाऊ मोगल

औरंगाबाद : लॉकडाउन असतानाही वारंवार सांगूनही लोक रस्त्यावर येत आहेत. त्यामुळे दोन दिवसांपासून पोलिस आणि जिल्हा प्रशासनावर टीकेची झोड उठली आहे. तसेच लोकप्रतिनिधींनीही प्रशासन कठोर भूमिका घेत नसल्याची खंत व्यक्त केली. यानंतर आता बुधवारपासून (ता.२९) सकाळी अकरापर्यंतच जीवनावश्‍यक वस्तूंची खरेदी-विक्री करता येणार आहे. सकाळी ११ ते रात्री ११ वाजतापर्यंत कडक लॉकडाउन असणार आहे. या काळात केवळ औषधी दुकानेच उघडी असतील, असे आदेश पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी दिले आहेत.

या आदेशाचे उल्लंघन करून कुणी जर बाहेर पडत असेल तर त्याच्यावर कडक कारवाई केली जाणार नाही. शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १०५ पर्यंत पोचली आहे. हॉटस्पॉटच्या संख्येतही वाढ झाल्याने जिल्हा, महापालिका व पोलिस प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे आहे. संचारबंदी, जमावबंदी घोषित करून महिना लोटला तरीही त्याची कठोर अंमलबजावणी झाली नाही. लोक खुलेआम फिरत असल्याने कुठलेही नियम पाळत नसल्यानेच शहरात शंभरच्या पुढे कोरोनाचे रुग्ण पोचले आहेत.

पोलिस, महापालिका आणि जिल्हा प्रशासनाने घेतलेली नरमाईची भूमिकाच यास कारणीभूत आहे, असा आरोप सुज्ञ नागरिक करीत आहेत. शिवाय याबाबत सोशल मीडियातून चौफर टीकाही करण्यात येत आहे. खासदार इम्तियाज जलील यांच्यासह लोकप्रतिनिधींनीही विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांची भेट घेऊन कडक लॉकडाउन करण्याबाबत मागणी केली. 

सकाळी अकरापूर्वीच करा खरेदी 
ता. २९ एप्रिल ते तीन मेपर्यंत लॉकडाउन व संचारबंदी जास्त कडक करण्याचा निर्णय घेतला असल्याचे आदेश संबंधित यंत्रणेला दिले आहेत. जीवनावश्यक वस्तू किंवा इफ्तारसाठीची फळे आता सकाळी अकराच्या अगोदरच खरेदी करावी, अशी माहिती पोलिस आयुक्तांनी दिली आहे. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: कुत्रा भुंकल्याने वाद पेटला; वाघोलीत दोन बहिणींवर दगड, सळई अन् लाथाबुक्क्यांनी हल्ला

Premium|Mithu Sen Artist : भाषा आणि रूढींना बगल देणारी कलावंत...

Pune Family Crime News : आईला बाहेर पाठवलं, ‘आधारकार्ड आणतो’ म्हणत घरी आला; मामाचा खून करून भाच्याची आत्महत्या

Sex Racket Busted : वाराणसीत खानावळ-बस बुकिंगच्या आडून 'कोडवर्ड' द्वारे सुरु होता वेश्याव्यवसाय; गेस्ट हाऊसवर छापा, ४ महिलांसह ७ जण ताब्यात

ICAI Global Expansion : जगातील ५० देशांत आयसीएआयचे जाळे निर्माण करण्याचे उद्दिष्ट आयसीएआयच्या राष्ट्रीय परिषदेत माहिती

SCROLL FOR NEXT