water scarity meeting news Aurangabad 
छत्रपती संभाजीनगर

त्या आमदारांना बांगड्या पोस्टाने पाठवणार, विद्यार्थी संघटनांचा आक्रोश 

प्रकाश बनकर

औरंगाबाद : मराठवाड्यातील पाणी प्रश्‍नासंदर्भात सर्व पक्षीय लोकप्रतिनिधीच्या बैठकीत मराठवाड्यातील 55 पैकी केवळ 11 आमदार उपस्थित होते. मराठवाड्यातील लोकप्रतिनिधीना दुष्काळ, पाणीप्रश्‍ना विषयी गंभीर नाही, यामुळे बैठकीत दांडी मारणाऱ्यांना आमदारांना पोस्टाने बांगड्या पाठवणार असल्याचे बैठकीस आलेल्या विद्यार्थ्यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले. मराठवाड्यावर सातत्याने होणाऱ्या अन्यायाविरोधात या विद्यार्थ्यांनी बैठकीतील उपस्थित आमदारांसमोर आपला संताप व्यक्‍त केला. 

आमदार प्रशांत बंब यांच्या पुढाकाराने शहरातील एका हॉटेलमध्ये सर्व पक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीसाठी मराठवाड्यातील सर्व पक्षीय आमदार, खासदार तसेच जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांना निमंत्रण पाठविण्यात आले होते. या बैठकीस आमदार हरिभाऊ बागडे, अतुल सावे, सूजितसिंह ठाकूर, नारायण कुचे, मेघना बोर्डीकर, अभिमन्यू पवार, राजेश पवार, राम पाटील रातोळीकर, संतोष दानवे, प्रशांत बंब आणि शिवसेनेचे संजय सिरसाट एवढे आमदार व औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मिना शेळके या बैठकीस हजेरी लावली. उर्वरित राष्ट्रवादी, कॉंग्रेस तसेच इतर पक्षातील आमदार खासदारांनी दांडी मारली. यामुळे बैठकीतील लोकप्रतिनिधीनी नाराजी व्यक्‍त केली. याच बैठकीत आलेल्या विद्यार्थ्यांनी या आमदाराविरोधात संताप व्यक्‍त करीत या आमदार पाणी प्रश्‍नी अनुपस्थितीत राहील्यामूळे संताप व्यक्‍त केला. 

या महिलांच्या पाठविणार बांगड्या 

विद्यार्थी म्हणाले, पाणी प्रश्‍न महत्वाचा आहे. आमदार आपल्या पगारवाढीच्या वेळी एकत्र येतात. स्वार्थांसाठी एकत्र येतात. फक्‍त मराठवाड्याच्या विकासाठी एकत्र का येत नाही, असे सांगत अनुपस्थिती असलेल्या आमदारांना बागड्या पाठविणार असल्याचे भूमिका यावेळी घेतल्या. यावेळी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयानी राग व्यक्‍त केला. एवढेच नव्हे तर या आमदारांना आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीच्या बांगड्या पाठविणार असल्याचे सांगण्यात आले. 

वॉटर ग्रीड रद्द करू नका 
वॉटर ग्रीड प्रकल्पामूळे मराठवाड्‌यातील पाणी प्रश्‍न सुटणार आहे. एवढेच नव्हे तर शेतकऱ्यांनाही संचिनासाठी पाण्याची उपलब्धता होणार आहे. यामूळे शेतकऱ्यांची आत्महत्या थांबणार असल्याचे सांगण्या येत होते. मात्र ही योजना रद्द होणार असल्याची बातम्या प्रसार माध्यमात आल्यामूळे मराठवाड्‌यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुले आणि सदस्यांनी थेट बैठकीच्या ठिकाणी धडले. बैठकीच्या ठिकाणी जाऊ शकले नाही. आत्महत्याग्रस्तासाठी काम करणाऱ्यां शामसुंदर कनके यांनी औरंगाबादेत समर्थ विद्यामंदिरात शिकणाऱ्या तील विद्यार्थ्यांनी या बैठकीत हजेरी लावत वॉटर ग्रीड योजना रद्द करू नका अशी मागणी केली. बैठकीस आलेल्या सर्व लोकप्रतिनिधी प्रवेशद्वाराजवळ बसलेल्या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पत्नी मुलांच्या भेटी घेत समस्या जाणून घेतल्या. यावेळी सर्वांनी शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी वॉटरग्रीड रद्द करू नका अशी मागणी केली. यासाठी सर्व आमदारांनी ही मागणी सरकारकडे मांडा असे विनंती केली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG, 2nd T20I: वैभव सूर्यवंशीचं अखेर पदार्पण झालं, पण कोणाला मिळाला संघातून डच्चू? पाहा भारत-इंग्लंडची Playing XI

Women Farmers Lead: भिवधानोरा गावातील शेतकरी महिलांची जलसंधारण, सेंद्रिय शेती व सामूहिक खरेदीत आदर्श कामगिरी; पाणी फाउंडेशन स्पर्धेत उठून दिसले योगदान

Latest Marathi Live Update : मुंबई-गोवा महामार्गावर दरड कोसळली; वाहतूक विस्कळीत

School Flooding: पहिल्याच पावसात अगरकानडगाव जि.प. शाळा जलमय; विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात, कायमस्वरूपी उपाययोजनेसाठी शिरसाट यांची पाहणी

Mumbai Rain: पावसाने उघड केलं विकासाचं वास्तव! मुंबईत झाडं कोसळली, रस्ते वाहून गेले, मिसिंग लिंकवर खड्ड्यांचं साम्राज्य

SCROLL FOR NEXT