Subhash Desai 
छत्रपती संभाजीनगर

औरंगाबादेत संपूर्ण लॉकडाउनची शिफारस, पण पालकमंत्री सुभाष देसाई म्हणाले...

मधुकर कांबळे/प्रकाश बनकर

औरंगाबाद : कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. काल एका दिवसांमध्ये सतराशे रुग्ण आढळले आहेत. ही परिस्थिती आणखी गंभीर होऊ शकते. ही बाब लक्षात घेऊन बेड वाढवणे, ऑक्सिजनचा पुरवठा करणे याची तजवीज केली जात आहे. हे सगळं करण्यासाठी राज्य शासनाकडून कोणतेही पाठबळ कमी पडू दिले जाणार नाही. रुग्णांची आभाळ होऊ दिली जाणार नाही. लसीकरण वाढवण्यासाठी लसीकरण केंद्र वाढवणे याबाबतच्या सूचना दिलेल्या आहेत. त्याचबरोबर चाचण्या वाढविण्यावरही भर दिला जाणार आहे. त्यामुळे लवकर निदान होऊन उपचार करणे सोयीचे जाणार आहे. 85 टक्के रुग्ण अशी आहेत की ज्यांच्यामध्ये लक्षणे दिसत नाही. ही एक दिलासा देणारी गोष्ट आहे, असे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी आशावाद व्यक्त केला. येथील जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषद पार पडली. त्यावेळी ते बोलत होते.


श्री. देसाई म्हणाले, लक्षणे दिसणाऱ्या ८५ टक्के रुग्णांना होम आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलेले आहे. औरंगाबाद जिल्ह्यामध्ये मृत्युदर ही कमी आहे. तो ०.९३ टक्के इतका आहे. ही दिलासा देणारी गोष्ट असली तरी जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग कमी करणे हे मुख्य उद्दिष्ट आहे आणि त्यादृष्टीने आमची तयारी सुरू आहे. लोकप्रतिनिधींच्या ही सूचना घेतल्या. वाढती रुग्णसंख्या पाहता आरोग्य विभागाने संपूर्ण लॉकडाउनच्या शिफारशी केलेल्या आहेत. परंतु संपूर्ण लोकांचा विचार करताना लोकांना कमीत-कमी त्रास व्हावा. यामुळे पूर्ण लाॅकडाऊन न करता आठवडाअखेर दोन दिवस पूर्णपणे लाॅकडाऊन, नाईट कर्फ्यू याच्यावर भर देण्याचा विचार करत आहोत. राज्याच्या आरोग्य विभागाचे मत घेऊनच संपूर्ण लॉकडाउन बाबत योग्य निर्णय लवकरच घेतला जाईल.


परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये. ही सर्वांची इच्छा आहे. यामुळे लवकरच लाॅकडाऊनबाबत निर्णय घेतला जाईल. गंभीर परिस्थिती येण्यापूर्वीच निर्णय घेणे गरजेचे आहे, अशा आरोग्य विभागाच्या सूचना आहेत. जनतेचे आरोग्य रक्षण हे महत्त्वाचे आहे. आपल्याला विकास वृद्धीदर हे तर सगळं हवं आहे. पण त्याशिवाय जनतेच्या आरोग्याचे रक्षण करणं, सुरक्षितता देणे हे देखील तितकाच महत्त्वाचा आहे. येणाऱ्या काळामध्ये कोणीही राजकीय कार्यक्रम जाहीर, जाहीर सभा घेऊ नये असे असे आवाहनही पालकमंत्री सुभाष देसाई यांनी केले. यावेळी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, महापालिका आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय, पोलिस आयुक्त निखील गुप्ता, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर मंगेश गोंदावले, पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील उपस्थित होते.

संपादन - गणेश पिटेकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kishor Kadam : अभिनेता किशोर कदम यांनी उजेडात आणला आणखी एक भयंकर प्रकार, व्यक्त केली 'ही' भीती; मुख्यमंत्री फडणवीसांकडे महत्त्वाची मागणी

Pune Crime: 'आयुष कोमकर खूनप्रकरणी आंदेकर टोळीतील चौघांना अटक'; गुजरातमधील द्वारका येथून घेतले ताब्यात, सोमवारी न्यायालयात हजर करणार

IND A vs AUS A: विराट, रोहित यांची फक्त हवा... ऑस्ट्रेलिया अ विरुद्धच्या ODI मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा, रजत पाटीदार कॅप्टन

Latest Marathi News Updates : दिवसभरात देश विदेशात काय घडलं जाणून घ्या एका क्लिकवर

Pune Fraud: 'चांगल्या परताव्याच्या आमिषाने दोघांची ४८ लाखांची फसवणूक'; सायबर चोरट्यांविरुद्ध पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल

SCROLL FOR NEXT