Sugarcane Producing Farmers News esakal
छत्रपती संभाजीनगर

ऊस जळून खाक ! पैठणमध्ये तोड मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल

पैठण तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना तोड मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

ज्ञानेश्‍वर बोरुडे

लोहगाव (जि.औरंगाबाद) : पैठण (Paithan) तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना तोड मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले असताना मुलानीवाडगाव शिवारातील दोन शेतकऱ्यांचा पाच एकर ऊस विजेचा शाॅर्ट सर्किटने जळाल्याची घटना शनिवार (ता.पाच) दुपारी घडली.नागरिकांनी वेळीच धावपळ करत आग आटोक्यात आणल्याने शेजारच्या शेतकऱ्यांचा वीस एकर ऊस पीक (Sugarcane Producing Farmers) आगीपासून वाचला आहे. मुलानीवाडगाव शिवारातील गट नंबर १०० मधील विजय काशिनाथ मिसाळ यांच्या तीन एकरातील ऊसाला दुपारी अचानक विजेच्या शाॅर्ट सर्किटमुळे आग लागली.(Sugarcane Producing Farmers In Trouble In Paithan Taluka Of Osmanabad)

हवेमुळे आग वाढत जाऊन याच गटातील बद्रीनाथ बापुराव इथापे यांच्या तीन एकराला लागलेली आग गावातील नागरिक शेतकऱ्यांनी धावपळ करून आटोक्यात आणल्याने शेजारील वीस एकर ऊस आगीपासून वाचला आहे. दरम्यान लोहगाव परिसरात विविध साखर कारखान्याला नोंदणी केलेल्या शेकडो हेक्टर १४ ते १५ महिन्यांचा ऊस पिकाला तोड मिळत (Aurangabad) नसल्याने शेतकरी हैराण झाले तर दुसरीकडे ऊस तोडणी मजुर, ट्रक, ट्रॅक्टर वाहतूक करणारे चालक आर्थिक पिळवणूक करत आहे. त्यामुळे ऊस उत्पादक हवालदिल झाले आहे. या पिळवणुकीला कारखाना पदाधिकारी, प्रशासनाने आळा घालावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video : Vaibhav Suryavanshi ला 'राष्ट्रीय बाल पुरस्कार'! १४ व्या वर्षात पठ्ठ्याने गाजवलंय क्रिकेटचं मैदान, विजय हजारे ट्रॉफीतून घेतली माघार

Nagpur Truck Accident: 'समृद्धी महामार्गावरील भीषण अपघातात दोघांचा मृत्यू'; एकजण गंभीर, दुरुस्तीसाठी ट्रक उभा अन् काय घडलं?

Explained: अरवली पर्वतरांग मुगलांसाठी कशी ठरली वरदान? 300 वर्ष टिकलेल्या साम्राज्यामागचं रहस्य, आजही आहे भारताच्या पर्यावरणाची ढाल

Real Estate 2026 : नवीन वर्षात घरांच्या किंमती वाढणार की कमी होणार? कोणत्या घरांसाठी जास्त मागणी असेल? जाणून घ्या तज्ञांचा अंदाज

Latest Marathi News Live Update : निवडणूक आयोगाचा आगळावेगळा नियम; उमेदवारांची घेणार लेखी चाचणी

SCROLL FOR NEXT