छत्रपती संभाजीनगर

आम्ही काय पाकव्याप्त काश्मिरात राहतो का? रेमडेसिविरवरुन सुरेश धस संतप्त

रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध करण्यासाठी नातेवाईक दोन - दोन दिवस ठाण मांडून बसत आहेत. तरीही इंजेक्शन भेटण्याची खात्री नाही.

दत्ता देशमुख : सकाळ वृत्तसेवा

बीड : आम्ही काय पाकव्याप्त काश्मीरमध्ये आहोत काय? आष्टी, शिरूर तालुका पाकव्याप्त काश्मीरमध्ये आहे काय, आम्हाला रेमडेसिविर इंजेक्शन्स का मिळत नाहीत, असा संतप्त सवाल करत आमच्यावर काय गुन्हे दाखल करायचेत तर करा, इथे राहण्यापेक्षा जेलमध्ये जाऊन राहू असेही भाजप आमदार सुरेश धस म्हणाले. त्यांनी गुरुवारी (ता.२२) दुपारी जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांची भेट घेतली. यावेळी श्री. धस यांनी अन्न औषधी प्रशासनालाही चांगलेच धारेवर धरले. काही खासगी औषधी विक्रेत्यांच्या काळ्याबाजाराचाही इथे उहापोह करण्यात आला. जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनीही खुर्चीवरुन उठून धसांच्या प्रत्येक प्रश्नांचे निरसन करण्याचा प्रयत्न केला. मागच्या पंधरवाड्यापासून जिल्ह्यात रेमडेसिविर इंजेक्शन्स आणि ऑक्सिजन तुटवडा जाणवत आहे. उपलब्ध करताना प्रशासनाचीही मोठी कसरत होत आहे.

दरम्यान, रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध करण्यासाठी नातेवाईक दोन - दोन दिवस ठाण मांडून बसत आहेत. तरीही इंजेक्शन भेटण्याची खात्री नाही. दरम्यान, याच मुद्द्यावर श्री.धस बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात पोचले.लोक रात्रंदिवस रेमडेसीवीर इंजेक्शन्साठी इकडे-तिकडे फिरत आहेत. तुम्ही नुसते कागदी घोडे नाचवत असल्याचा आरोप करत अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी खासगी रूग्णालयांतले इंजेक्शन जप्त करत आहेत. पण ते जातात कुठे असा सवालही धसांनी केला. उद्यापर्यंत रेमडेसीवर इंजेक्शन व्यवस्थितपणे सर्वांना मिळाले नाही तर आंदोलन करू, असा इशाराही धसांनी दिला. दरम्यान, आक्रमक झालेल्या धसांनाही जिल्हाधिकाऱ्यांनी वितरणाची व उपलब्धतेची सर्व इत्यंभूत माहिती देऊन त्यांच्या शंकांचे निरसन करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या समवेत आमदार लक्ष्मण पवार, वंचितचे विभागीय अध्यक्ष अशोक हिंगे आदी होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT