Sambhaji Nagar News sakal
छत्रपती संभाजीनगर

Sambhaji Nagar News : संशयित काश्मिरी तरुण, महिला ताब्यात

बुढीलेन परिसरात गुरुवारी (ता.२१) रात्री साडेदहाच्या सुमारास संशयित काश्मिरी तरुण व महिला भीक मागताना आढळून आले. त्यांच्यासोबत दोन लहान मुलेही होती.

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : बुढीलेन परिसरात गुरुवारी (ता.२१) रात्री साडेदहाच्या सुमारास संशयित काश्मिरी तरुण व महिला भीक मागताना आढळून आले. त्यांच्यासोबत दोन लहान मुलेही होती. त्यांच्या पेहरावावरून व देहबोलीवरून ते काश्मिरी असल्याचे दिसत होते. त्यामुळे काही मुस्लिमबांधवांनी तातडीने पोलिसांना बोलावले.

घटनास्थळी पोलिस उपायुक्त नितीन बगाटे, पोलिस निरीक्षक निर्मला परदेशी आणि मोठा फौजफाटा दाखल झाला होता. ताब्यात घेत असताना काश्मिरी महिलांनी पोलिसांना प्रतिकार केला. चित्रीकरण करणाऱ्या तरुणांनाही या महिलांनी मारहाण केली. त्यानंतर पोलिसांनी व्हॅन बोलावून त्यांना ताब्यात घेतले.

पोलिसांनी त्यांना सिटी चौक ठाण्यात आणले. त्यांनी आम्ही सर्व कुपवाडा येथील असून, बसस्थानक परिसरात एका महिलेच्या घरी राहात असल्याचे आणि तिकडे कामे नसल्यामुळे आम्ही गुजरात, महाराष्ट्रात भीक मागण्यासाठी येत असल्याचे सांगितले. दरम्यान, एटीएसच्या कर्मचाऱ्यांनीदेखील सिटी चौक पोलिस ठाणे गाठून संशयितांची चौकशी केली. त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करणार असल्याची माहिती पोलिस निरीक्षक निर्मला परदेशी यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

झुरळ, अस्‍वच्‍छता अन्‌ शिळे अन्न, ‘एफडीए’ची पुण्यासह विभागात कारवाई; चार हॉटेलांचे परवाने निलंबित

Asian Games, Cricket: भारत-बांगलादेश सेमीफायनलमध्ये आमनेसामने! गोल्ड मेडलच्या लढतीत मिळवणार साथ? कुठे पाहाणार सामना?

Maharashtra Weather: मॉन्सूनचा परतीचा प्रवास सुरू; बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र, २५ ते २८ सप्टेंबर राज्यात पावसाची शक्यता

Shahi Tukda Recipe: सणासुदीला बनवा लज्जतदार स्वीट डिश; कुरकुरीत ब्रेड अन् केशर-रबडीयुक्त शाही तुकडा!

Pune FDA Action: सहा तास पाठलाग, मार्गही बदलला; अखेर चाकणमध्ये गुटख्याचा ट्रक पकडला, १.१३ कोटींचा मुद्देमाल जप्त

SCROLL FOR NEXT