Aurangabad amc news 
छत्रपती संभाजीनगर

सावलीतही बसतोय झळांचा चटका 

मधुकर कांबळे

औरंगाबाद : निरभ्र आकाशामुळे आणि बाष्पयुक्त ढगांचा कसलाच अडथळा नसल्याने गेल्या पाच - सहा दिवसांपासून उन्हाचा पारा वाढला आहे. मंगळवारी (ता.२६) ऊनसावल्यांचा खेळ सुरू असला तरीही शिराळ पडल्यावरसुद्धा उष्ण हवेच्या झळा असह्य करणाऱ्या होत्या. सध्या ऊन वाढले असले तरी नैर्ऋत्य मॉन्सूनचे वेळेवर आगमन होण्यासाठी हे ऊन पूरक असल्याचे अभ्यासकांनी सांगितले. 

लॉकडाउनमुळे वाहने फारशी रस्त्यावर आली नाहीत. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत तापमानात चक्क उन्हाळा असूनही वाढ झाली नव्हती. मात्र गेल्या पाच सहा-दिवसांत उन्हाचा चटका चांगलाच जाणवत आहे. जिथे झाडे आहेत त्या परिसरातील घरांमध्ये बसण्यासारखी परिस्थिती आहे; मात्र जिथे झाडे नाहीत तिथे पंखे, कूलर लावण्याशिवाय पर्याय राहिला नाही. दिवसाही उष्णता आणि रात्री उकाडा जाणवत आहे. मधूनच सूर्य ढगाआड गेल्यानंतर काही काळासाठी सावली पडत असली तरी उष्ण हवेच्या झळा लागत आहेत. 

अचानक गेल्या पाच-सहा दिवसांपासून वाढलेल्या तापमानांच्या कारणांविषयी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या भूगोल विभागाचे प्रमुख, हवामानाचे अभ्यासक डॉ. मदन सूर्यवंशी यांनी सांगितले, की काही दिवसांपूर्वी बंगालच्या उपसागरात अम्फान वादळ आले होते. याचा बारा ते चौदा दिवसांचा काळ होता. ज्यावेळी हे वादळ आले त्यावेळी आपल्याकडे उन्हाळा सुरू होता. या वादळामुळे बाष्पयुक्त ढग आल्याने नेहमीप्रमाणे उष्णतेची दाहकता जाणवली नाही. या वादळानंतर आता आकाश निरभ्र झाले आहे, बाष्पयुक्त ढग नाहीत आणि हवेत आर्द्रतेचे प्रमाण नसल्याने उन्हाची तीव्रता वाढली आहे.

आणखी काही दिवस ही लाट अशीच राहील. तथापि, ऊन जेवढे जास्त कडक पडेल तेवढे नैर्ऋत्य मॉन्सूनच्या आगमनासाठी चांगले. उन्हामुळे बाष्पीभवनाचा वेग वाढणार असल्याने पाऊसही चांगलाच पडतो. मानवी शरीराचे तापमान ३७-३८ डिग्री सेल्सिअस असते; मात्र यापुढे तापमान वाढले तर उष्माघात होऊ शकतो. याचा लहान मुले, वृद्ध, शेतात काम करणाऱ्यांना जास्त त्रास होतो असे डॉ. सूर्यवंशी म्हणाले.  

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

डोळ्यांसमोर मुलगा तडफडत होता… लॉक झालेल्या कारमध्ये ३ वर्षांचा चिराग जिवंत जळाला; लग्नाच्या ८ वर्षांनी झालेला मुलगा काळाने हिरावला

Solapur Crime: वडिलाकडून मुलाचा निर्घृण खून; जुन्या रागातून कृत्य, माढा तालुक्यातील घटना, लोखंडी मेकने डोक्यावर वार!

Nagpur crime : दोन दिवसांपूर्वी लग्न झालेल्या प्रियकराला व्हिडिओ कॉल, नंतर २३ वर्षीय विद्यार्थिनीने जे केलं ते धक्कादायक...

'सगळ्या गोष्टींचा मनस्ताप होतोय' मलायका आरोरा नेटकऱ्यांवर संतापली, म्हणाली...'आता हे माझ्यासाठी त्रासदायक...'

Pune Crime: ट्रेडिंग अन् टास्कच्या आमिषाने फसवणूक; पुण्यातील चौघांना तब्बल ६७ लाखांचा गंडा, पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल!

SCROLL FOR NEXT