result result
छत्रपती संभाजीनगर

SSC Result: दहावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार येत्या नऊ ऑगस्टला गुणपत्रिका

दरवर्षी निकाल जाहीर झाल्यानंतर आठ ते दहा दिवसांत शाळांमार्फत विद्यार्थ्यांना गुणपत्रिकांचे वितरण केले जाते

संदीप लांडगे

औरंगाबाद: राज्यात दहावीचा निकाल जाहीर होऊन पंधरा दिवस उलटले, तरी प्रत्यक्ष गुणपत्रिका मिळत नसल्याने विद्यार्थ्यांना इतर प्रवेशासाठी अडचणी येत होत्या. परंतु, येत्या नऊ ऑगस्टपासून विद्यार्थ्यांना शाळामार्फत गुणपत्रिका देण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातील अधिकाऱ्यांनी सांगितले. यंदा कोरोनामुळे शासनाने राज्य मंडळातर्फे घेण्यात येणारी दहावीची परीक्षा रद्द केली होती. विद्यार्थ्यांच्या अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला होता. त्यानुसार १६ जुलैला दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला.

दरवर्षी निकाल जाहीर झाल्यानंतर आठ ते दहा दिवसांत शाळांमार्फत विद्यार्थ्यांना गुणपत्रिकांचे वितरण केले जाते. परंतु, यंदा दहावीचा निकाल जाहीर होऊनही १५ दिवस उलटले, तरीही अद्याप गुणपत्रिका न मिळाल्याने विद्यार्थी-पालकांकडून नाराजी व्यक्त होत आहे. दरम्यान, सध्या दहावीच्या गुणपत्रिकांचे छपाईचे काम वेगात होत असून, ते अंतिम टप्प्यात आहे. गुणपत्रिका विभागीय मंडळाकडून शाळांना वितरित करण्यासाठी सात आणि नऊ ऑगस्टपर्यंतचा कालावधी दिला आहे. तसेच प्रत्येक वितरण केंद्राला जोडलेल्या शाळांची संख्या लक्षात घेऊन जादा वितरण केंद्रे तयार करणे, वितरण केंद्रावर खिडक्यांची संख्या वाढविण्यात येतील. संबंधित शाळांनी विद्यार्थ्यांना नऊ ऑगस्ट दुपारी तीन वाजल्यापासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे पालन करून गुणपत्रिकांचे वितरण करावे, अशी सूचना राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी दिली आहे.

गुणपत्रिका न मिळाल्याने प्रवेशात अडसर-
- आयटीआय प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू; परंतु पुढील प्रवेश प्रक्रिया दहावीची गुणपत्रिका मिळाल्यानंतर
- अभियांत्रिकी व तंत्रज्ञान पदविका अभ्यासक्रमाचा प्रवेश अर्ज भरताना मूळ गुणपत्रिकेअभावी अडथळा
- अकरावीसाठी ‘सीईटी’नंतर होणार असली तरी त्याव्यतिरिक्त दहावीनंतरच्या विविध अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया लांबली जाण्याची शक्यता

दहावीच्या विद्यार्थ्यांना छापील गुणपत्रिका न मिळाल्याने पदविका, आयटीआयसारख्या प्रवेश प्रक्रियेत अडचणी येत आहेत. अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान पदविका अभ्यासक्रमात ऑनलाइन अर्ज भरताना विद्यार्थ्यांकडून शाळा सोडल्याचा दाखला मागविला जात आहे. परंतु अद्याप गुणपत्रिका न दिल्याने विद्यार्थ्यांना हा दाखला देणे शक्य होत नाही.
- एस. पी. जवळकर (मुख्याध्यापक)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CISF जवानाचा सहकाऱ्यांवर गोळीबार, असिस्टंट कमांडंटसह ४ जवानांचा मृत्यू

Vani News : सासरी होणाऱ्या मानहानी अन् छळाला कंटाळून तरुणाने संपविले जीवन; स्टेटसवर व्हिडिओ ठेवत उघड केला प्रकार

Japanese Encephalitis Virus: आसाममध्ये डासांमध्ये जपानी मेंदूज्वराचा जी-१ विषाणू प्रथमच आढळला; ‘एनआयव्ही’ पुण्याचे संशोधन अमेरिकन जर्नलमध्ये प्रकाशित

Gujarat High Court: मोदींचं डिग्री प्रकरण! अरविंद केजरीवालांची याचिका फेटाळली, उच्च न्यायालयाने २५ हजारांचा दंड ठेवला कायम

जनता दुष्काळात, तहसीलदार सुट्टीवर; जिल्हाधिकाऱ्यांनी पदभारच काढून घेतला, अधिकारी उरला नावाला

SCROLL FOR NEXT