Tenth-twelfth exams online or offline sakal
छत्रपती संभाजीनगर

दहावी-बारावीच्या परीक्षा ऑनलाइन की ऑफलाइन?

विद्यार्थी उभे ठाकले आमने-सामने

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : ऑनलाईन परीक्षा व्हाव्यात यासाठी राज्यात सोमवारी ठिकठिकाणी विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते. तर परीक्षा ऑफलाईनच घेण्यात याव्यात अशी मागणी देखील काही विद्यार्थी करत आहेत. त्यामुळे दहावी, बारावीच्या परीक्षा ऑनलाईन की ऑफलाईन याबाबत विद्यार्थी आमने-सामने उभे ठाकले आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावी, बारावीच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. नियोजित वेळापत्रकानुसार परीक्षा घेण्यावर बोर्ड ठाम आहे. मात्र, दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना सरकारचा हा निर्णय मान्य नाही. कारण कोरोनामुळे यंदाचे दोन महिने वगळता मुलांचे दहावी, बारावीचे वर्ग भरले नाहीत. त्यात ऑनलाइन शिक्षणाची साधने नसणाऱ्या सर्वच विद्यार्थ्यांचा बोर्डाच्या परीक्षेच्या अनुषंगाने आभ्यास झालेला नाही. असे असताना यंदा बोर्ड जर विद्यार्थ्यांची नियोजनानुसार व प्रचलित मूल्यमापन पद्धतीने परीक्षा घेणार असेल तर हे विद्यार्थ्यांसाठी अन्याय कारक होईल, असे काही विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.

तर काही विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे की, घरी बसून ऑनलाइन परीक्षा घेणे म्हणजे सामुदायिक कॉपीला उत्तेजन दिल्या सारखे आहे. ऑनलाइन परीक्षा देताना विद्यार्थी मनाने पेपर सोडवतील का? यासारख्या परीक्षेतून हुशार विद्यार्थ्यांवर अन्याय होवू शकतो. वर्षात एकदाही पुस्तक सुद्धा न उघडता विद्यार्थ्यांना ऑनलाईनच्या माध्यमातून ९० ते १०० टक्के गुण मिळू शकतात. अशा परीक्षा, मूल्यमापनाला किंवा पास होण्याला भविष्यकाळात काय किंमत असेल? परीक्षा ही अभ्यास करण्याचे माध्यम आहे. परीक्षेमुळेच विद्यार्थी अभ्यास करतो. ऑनलाईन परीक्षा हे अभ्यास बंद करण्याचे माध्यम बनेल आणि विद्यार्थी निष्क्रिय बनेल. त्यामुळे त्याचा शिक्षणाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल. त्यामुळे परीक्षा ऑफलाईन घ्याव्यात, अशी मागणी काही विद्यार्थी करत आहेत.

''वर्षभरापासून कोरोनामुळे शाळा, कॉलेज बंद असताना बोर्डाकडून दहावी, बारावीच्या परीक्षा घेण्याचा घाट घातला जात आहे. अद्याप कोणत्याही विषयाचा आभ्यासक्रम पूर्ण झालेला नाही. त्यामुळे तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता परीक्षा रद्द कराव्यात अथवा पुढे ढकलण्यात याव्यात.''

- अब्दुल शेख, विद्यार्थी

''कोरोनाच्या अनुषंगाने वर्षभरापासून शाळा, कॉलेज बंद असले तरी, ऑनलाईन कधी ऑफलाईनच्या माध्यमातून वर्ग सुरु आहेत. त्यामुळे परीक्षेची तयारी पूर्ण झालेली आहे. ऑनलाईन परीक्षा म्हणजे कॉपीला प्रोत्साहान दिल्यासारखे आहे. त्यामुळे ऑफलाईन परीक्षा घेणे हितकारक आहे.''

- अविनाश बाहेती, विद्यार्थी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Accident: स्वामी दर्शनासाठी निघालं कुटुंब, पण वाटेतच कोसळला दुःखाचा डोंगर; ५ महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू, ५ जण जखमी!

Land Dispute: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! जमिनीचे वाद सोडवणे झाले सोपे; महाराष्ट्र जमीन महसूल संहितेत बदल

Maratha Reservation News: 'जरांगे तुझ्यात दमच नाही' बारस्करांनी दिलं चॅलेंज, नेमकं काय म्हणाले?

PBKS vs RCB: वेंकटेश अय्यरची तुफानी फटकेबाजी, विराट कोहलीचंही विक्रमी अर्धशतक; बंगळुरूने पंजाबसमोर ठेवलं भलं मोठं लक्ष्य

Bhumii Utsav 2026 : बारामतीत ‘भूमी उत्सव 2026’ उन्हाळी प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद; 200 हून अधिक लघुउद्योजकांचा सहभाग

SCROLL FOR NEXT