thief sakal
छत्रपती संभाजीनगर

चोराचा 2,500 कि.मी. पाठलाग, २८ लाखांच्या दागिन्यांच्या लावला छडा

चोरट्यांचा पाठलाग करीत पोलिसांचा महाराष्ट्रापासून सुरु झालेला ‘प्रवास’ गुजरात, मध्यप्रदेश, राजस्थानपर्यंत तब्बल २ हजार ४०० किलोमीटर अंतर पार करुन नक्षलग्रस्त भागात संपला

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : मुंबईहून अमरावतीकडे येणाऱ्या कुरिअर बॉयच्या ताब्यातून २८ लाखांचे दागिने पळवून नेल्याप्रकरणातील आरोपींचा शोध घेण्यात रेल्वे पोलिसांना यश आले. चोरट्यांचा पाठलाग करीत पोलिसांचा महाराष्ट्रापासून सुरु झालेला ‘प्रवास’ गुजरात, मध्यप्रदेश, राजस्थानपर्यंत तब्बल २ हजार ४०० किलोमीटर अंतर पार करुन नक्षलग्रस्त भागात संपला. लोहमार्ग पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी पोलिसांच्या तपास पथकाला १० हजार रुपयांचे रोख बक्षिस, प्रशस्तीपत्र देत पाठीवर कौतुकाची थाप दिली.

याप्रकरणी फिर्यादी संतोष रामेता ऊर्फ रामहेत जाटव (२७, रा. सराफा बाजार, अमरावती) हे कुरिअरमध्ये काम करतात. १ फेब्रुवारी रोजी मुंबईहून २१ लाख २६ हजार ५४० रुपयांचे सोने आणि ६ लाख ४४ हजार ९४२ असे एकूण २७ लाख ७१ हजार ४८२ रुपयांचे सोने कुरिअर कंपनीकडून मुंबई मेल रेल्वेने मुंबई-अमरावती प्रवास करत होते. दरम्यान जळगाव स्थानकाजवळ वेग कमी होताच मास्क घातलेल्या एकाने सदर कुरिअरची बॅग हिसकावत पायाला झटका देऊन रेल्वेतून उडी मारली. फिर्यादी संतोष यांनीही रेल्वेतून उडी घेत आरोपीचा पाठलाग केला मात्र तो न सापडल्याने लोहमार्ग पोलिस ठाणे भुसावळ येथे गुन्हा दाखल केला होता.

असा लागला छडा

याप्रकरणी अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी प्रभारी अधिकारी विजय घेरडे यांना तपासाच्या सूचना केल्यानंतर पथके तयार केली. फिर्यादी संतोषच्या संपर्कात असलेल्या कुरिअर कंपनीतील इतर कामगार तसेच त्यांच्या मित्रांचे मोबाईल लोकेशन तपासले आणि जळगाव स्थानकाहून बॅग हिसकावलेल्याचे तसेच मुंबईतून हस्तगत केल्याचे सीसीटीवी फुटेज तपासले असता संशयिताची ओळख पटली. त्याचे लोकेशन पोलिसांनी तपासले असता, तो पुष्पेंद्र उर्फ पिंटु असल्याचे समजले. आरोपी पुष्पेंद्रचे लोकेशन मध्यप्रदेशात सापडले. पोलिस तिथे पोहोचताच तो अहमदाबादमध्ये गेला. पोलिसांनी अहमदाबाद गाठताच त्याचे लोकेशन राजस्थानमार्गे मध्यप्रदेशातील बावडीपूरा, जि. मुरेना येथे मिळाले. सापळा रचून त्याला ताब्यात घेतले असता, कुरिअर कंपनीतील दुर्गेश सिकरवार याने फिर्यादी संतोष याची सर्व माहिती दिल्याचे कळाले. तसेच आरोपीने त्याचा भाचा विष्णूच्या मदतीने संतोष झोपल्याचा फायदा घेऊन बॅग पळविल्याची कबुली दिली. चोरीचे सोने दुर्गेश सिकरवारच्या घरी ठेवल्याचे सांगितले.

ही कारवाई अधीक्षक मोक्षदा पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी दिपक काजवे यांच्या मार्गदर्शनाखाली विजय घेरडे, एपीआय भाउसाहेब मगरे, इंगळे, ठाकूर, खंडारे, राजपुत, शेजवलकर, तडवी, देवे, जैन, मिर्झा, तसेच औरंगबादेतील सायबर सेलच्या एपीआय प्रेमलता गोमाशे-जगताप, शिपाई पाटील यांच्या पथकाने चंबळ खोऱ्यातील अतिदुर्गम नक्षलग्रस्त भागात केली.

  • लोहमार्ग पोलिसांची कारवाई ः कुरिअरवाल्याचे २८ लाखांचे पळविले होते दागिने

  • महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश, राजस्थान नक्षलग्रस्त भागातही केला पाठलाग

  • एसपी मोक्षदा पाटील यांच्याकडून पथकाला १० हजारांचे रोख बक्षिस

संशयित चलाख होता. त्याचे २०१९ पासूनचे फोटो, व्हॉटसअप चॅटींग इतकेच नव्हे तर तीन वर्षापर्यंत कोणकोणते बूट घालतो हे सर्व मॅच करुन त्याला पकडले. दोन्ही आरोपींना भुसावळ न्यायालयाने १४ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

-विजय घेरडे, रेल्वे स्टेशन इंचार्ज, भुसावळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill: भारताच्या सर्वात मोठ्या विजयासह कर्णधार गिलने मोडला गावसकरांचा ४९ वर्षांपूर्वीचा विक्रम अन् घडवला नवा इतिहास

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT