गौरी बगाडे  सकाळ
छत्रपती संभाजीनगर

हौदात पडून तीन वर्षांच्या चिरमुड्या गौरीचा मृत्यू, वाळूजमधील घटना

रामराव भराड

जवळच गौरी वैभव बगाडे ही तीन वर्षांची चिमुकली इतर मुलांसह खेळत होती.

वाळूज (जि.औरंगाबाद) : खेळत असताना पाण्याच्या हौदात पडून तीन वर्षीय मुलीचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी (ता.३०) सकाळी दहा वाजेच्या सुमारास वाळूज (Waluj) येथे घडली. गौरी वैभव बगाडे (वय 3) असे मृत मुलीचे नाव आहे. वाळूज येथील (Aurangabad) दत्तनगरात बगाडे कुटुंबाच्या घरी रविवारी दशक्रिया विधीचा कार्यक्रम होता. जवळच गौरी वैभव बगाडे ही तीन वर्षांची चिमुकली इतर मुलांसह खेळत होती. खेळता- खेळता गौरी गणेश शेंद्रे यांच्या पाण्याने भरलेल्या हौदात सकाळी दहा वाजेच्या सुमारास पडली. (Three Years Old Girl Died After Fallen Water Tank)

इतर मुलांमध्ये गौरी दिसत नसल्याने तिचा परिसरात शोध घेण्यात आला. दरम्यान, हौदात पाहिले असता ती पाण्यात पडलेली आढळून आली. तिला उपचारासाठी वैभव बगाडे व पांडुरंग पाठफुले यांनी घाटीत दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. पोलिस उपनिरीक्षक लक्ष्मण उंबरे यांनी घटनास्थळी पाहणी करून पंचनामा केला. या प्रकरणी वाळूज पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास पोलिस निरीक्षक संदीप गुरमे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेडकॉन्स्टेबल विठ्ठल खंडागळे करित आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

वडिलांच्या मृत्यूनंतर अंत्यसंस्कारच केले नाहीत; मृतदेह प्रिझर्व्ह करून ठेवला, मुंबईतील खळबळजनक घटना

Malvan Accident : दुचाकीच्या धडकेत भाजप नगरसेविकेसह चौघे जखमी, सरकारी दवाखान्यात एक्स रे मशीन बंद असल्याने संताप

LPG Cylinder Price: उद्यापासून गॅस सिलेंडर महागणार? महाराष्ट्रात आज कितीला मिळतो LPG, पाहा शहरनिहाय दर

Pradip Purnekar case: ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याच्या हत्येचा CCTV फुटेज समोर, ७ गोळ्या झाडल्याचा आवाज

Ayush Thite Organ Donation : सोलापूरच्या आयुषच्या हृदयाने रशियातील तीन वर्षांच्या चिमुकल्याला मिळणार नवजीवन; अवयवदानाने वाचणार चौघांचे प्राण

SCROLL FOR NEXT