photo 
छत्रपती संभाजीनगर

CoronaVirus : तीन हजार मजुर उन्नाव, आग्रा येथे रेल्वेने रवाना

अनिलकुमार जमधडे

औरंगाबाद : लॉकडाऊनच्या काळात विविध राज्यातील कामगार व मजुरांना  निवारागृहात ठेवण्यात आले होते. शहरातील वाळुज सह मराठवाड्यातील विविध भागात थांबलेल्या तीन हजार मजुरांना गुरुवारी (ता. १४) उन्नाव आणि आग्रा येथे दोन विशेष रेल्वेने रवाना करण्यात आले.
रेल्वे स्टेशन समोर गुरुवारी (ता. १४) सकाळ पासूनच आपल्या गावी परतण्यासाठी आतूर असलेल्या परप्रांतीय कामगारांची गर्दी सकाळपासुनच सुरू झाली होती. यावेळी कामगारांनी गर्दी केल्यामुळे सोशल डीसिस्टंसिंगचा पुरता फज्जा उडाला. मजुरांची नावे तपासून त्यांना रेल्वे स्थानकात सोडण्यात येत होते. 

एका सिटवर एकच व्यक्ती 

रेल्वेत एका सिटवर एकच व्यक्तीला बसण्याची परवानगी देण्यात आली होती. रेल्वेत जाणाऱ्या प्रवाशांना जाताना जेवणाचा डब्बा आणि पाण्याची एक बॉटल देऊन त्यांना रेल्वे कर्मचाऱ्यांनी रेल्वेत बसविले. या रेल्वेत एकुण दीड हजार प्रवाशांना बसविण्यात आले. ही रेल्वे दुपारी अडीच वाजेच्या दरम्यान उन्नावकडे रवाना झाली. 

रेल्वेस्थानकावर गर्दी 

रात्री नऊ वाजता आग्रा येथे सोडण्यात आलेल्या रेल्वेनेही दीड हजार मजुरांना पाठविण्यात आले. रेल्वेत प्रवाशी बसविताना सोशल डिस्टनन्सचा नियम या श्रमीकांना सांगण्यात आला. असले असे तरीही रेल्वेस्थानकावर सुरुवातीला मात्र चांगलीच गर्दी झाली होती. त्यानंतर मात्र ही गर्दी बाजूला करून सोशल डिस्टन्स पालन करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

पोलिस बंदोबस्त 

तोडांवर मास्क असलेल्या व्यक्तीलाच रेल्वे स्टेशनमध्ये प्रवेश देण्यात येत होता. प्रत्येक प्रवाशाला भोजनाचे पाकीट, सॅनिटायझर देण्यात येत होते. मराठवाड्याच्या विविध ठिकाणाहुन प्रशासनाने एसटी महामंडळाच्या बसमधून आणि पोलिसांच्या वाहनातून प्रवाशांना रेल्वे स्थानकात आणण्यात आले होते. रेल्वे स्थानक परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त लावण्यात आला होता. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Koyna Dam Water Release : कोयना धरणातून 3983 क्युसेक विसर्ग; कृष्णा नदीची पातळी वाढणार, आज सायंकाळपर्यंत पाणी पोहोचणार सांगलीत

Gangs Of Wasseypur: वासेपूर पुन्हा गोळीबाराने हादरले; फहीम खानच्या भावावर दिवसाढवळ्या हल्ला, गँगवॉर पुन्हा भडकणार?

Xiaomi 18 Pro Series होणार लाँच! 8500mAh बॅटरी, ड्युअल 200MP Leica कॅमेरा; पाहा नव्या फ्लॅगशिपचे भन्नाट फीचर्स!

Marathi News Live Updates : छात्रों की गूंज' हा पुढील कार्यक्रम चेन्नईमध्ये

Mumbai Water Metro: मुंबई वॉटर मेट्रोसाठी समुद्रतळाचा मोठा अडथळा; खडकाळ भागात ‘रॉक ड्रेजिंग’, २५० किमी जलमार्गांचा विकास

SCROLL FOR NEXT