accident 
छत्रपती संभाजीनगर

पाचवीच्या कार्यक्रमाला जाताना काळाचा घाला, मायलेकाचा अपघातात मृत्यू

सुभाष होळकर

शिवना (जि.औरंगाबाद) : मादनी (ता. सिल्लोड) नजीक रिक्षा व दुचाकीची समोरासमोर झालेल्या अपघातात दोन ठार, तर दोन जण जखमी झाले. ही घटना रविवारी (ता.११) दुपारी बाराला अजिंठा- बुलडाणा राज्यमार्गावर घडली. अजिंठा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोटावद (ता.जामनेर) येथील भाजीपाल्याचे व्यापारी सागर सुभाष थोरात हे त्यांना कन्यारत्न प्राप्त झाल्याने पाचवीच्या कार्यक्रमासाठी आपल्या आई व नातेवाईकांना रिक्षामध्ये घेऊन लाखनवाडा (जि.बुलडाणा) येथे निघाले होते.

शिवना बसस्थानक सोडल्यावर मादनी गावानजीक समोरून येणाऱ्या दुचाकीसोबत समोरासमोर झालेल्या भीषण अपघातात त्यांच्या आई मालताबाई सुभाष थोरात (वय ५५) या जागीच ठार झाल्या, तर ऐश्वर्या राहुल थोरात (रा. पहूर, ता.जामनेर) ही त्यांची आठ वर्षीय भाची किरकोळ जखमी, स्वतः सागर सुभाष थोरात (वय २७) हे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारार्थ जळगाव येथे हालविण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.


दुचाकीवरील किशोर संजय राऊत (वय २२) व योगेश संजय राऊत (वय २८) हे दोघे सख्खे भाऊ (रा.मादणी ता. सिल्लोड) गंभीर जखमी असून पुढील उपचारार्थ त्यांना घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अजिंठ्याचे सहायक पोलीस निरीक्षक किरण आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार निलेश शिरसकर, कौतिक चव्हाण पुढील तपास करित आहेत.

संपादन - गणेश पिटेकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

French Open 2026: २५ व्या ग्रँडस्लॅमसाठी नोवाक जोकोविचचा महासंघर्ष! २ तास ५१ मिनिटांच्या थरारात कसाबसा मिळवला विजय!

आजचे पंचांग आणि दिनविशेष - २६ मे २०२६

ढिंग टांग : मार्को रुबियो रिपोर्ट..!

जीवनमान-जीवनभान : संजीवनी देणारी ‘सीपीआर’ पद्धत

RCB vs GT Qualifier 1: RCB सलग दुसऱ्यांदा फायनलमध्ये जाणार? गुजरात टायटन्सशी आज ‘क्वालिफायर वन’ लढत धरमशालामध्ये रंगणार

SCROLL FOR NEXT