छत्रपती संभाजीनगर

देवीचे दर्शन घेऊन परताना दोन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू

वाळूज (जि.औरंगाबाद) : भांगशी मातेचे दर्शन घेऊन घराकडे जात असताना रस्त्यात नितळछाक पाणी पाहून अंघोळीचा मोह आवरता न आल्याने पाण्यात उतरलेल्या तिघांपैकी दोघांचा बुडून मृत्यू झाला.

रामराव भराड

वाळूज (जि.औरंगाबाद) : भांगशी मातेचे दर्शन घेऊन घराकडे जात असताना रस्त्यात नितळछाक पाणी पाहून अंघोळीचा मोह आवरता न आल्याने पाण्यात उतरलेल्या तिघांपैकी दोघांचा बुडून मृत्यू झाला. तर एक जण सुदैवाने कसातरी बचावला. ही दुर्दैवी घटना रविवारी (ता.दहा) सायंकाळी घडली. वाळूज औद्योगिक (Waluj MIDC) परिसरातील रांजणगाव (शेणपुंजी) येथील कृष्णानगरात स्टरलाइट कंपनीचा कामगार प्रल्हाद रामा चव्‍हाण (वय 24) व बाळू अण्णा पालवे असे कुटुंबासह राहतात. पालवे यांच्याकडे दोन दिवसांपूर्वी त्याचा साला नितीन रमेश गुंडाळे (19, रा. जळगाव घाट, ता. कन्नड) हा आला होता. रविवारी नितीन रमेश गुंडाळे, प्रल्हाद रामा चव्हाण व बाळू अण्णा पालवे असे तिघे (Aurangabad) जण भांगशी मातेच्या दर्शनासाठी गेले होते.

दुपारचे जेवणही त्यांनी गडावरच केले. तेथून घरी जात असताना गडाजवळ स्वच्छ पाण्याचे तळे त्यांना दिसले. त्यात अंघोळ करण्याचा मोह त्यांना आवरता आला नाही. त्यामुळे तिघेही पाण्यात अंघोळीसाठी उतरले. मात्र त्यांना पोहता येत नसल्याने तिघेही पाण्यात बुडाले. सुदैवाने बाळू अण्णा पालवे या पाण्यातून कसाबसावर आला. तर नितीन रमेश गुंडाळे व प्रल्हाद रामा चव्हाण हे दोघेही पाण्यात बुडून मृत झाले. अग्निशमन दलाच्या जवानांसह नागरिकांनी मदतकार्य करून त्यांना पाण्यातून बाहेर काढून उपचारार्थ घाटीत दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. या घटनेची नोंद दौलताबाद पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पक्षात खदखद! नेतृत्वावर थेट प्रश्न अन्...; राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याची भावनिक पोस्ट चर्चेत, काय म्हणाले?

जमीन, जागेची खरेदी-विक्री आता कोणत्याही तालुक्यात! खरेदी-विक्री व्यवहारातून राज्याच्या तिजोरीत ५८,६७३ कोटी; ३१ मार्चपर्यंत सुट्टीतही सुरु राहणार कार्यालये

सोने-चांदीच्या भावात अचानक वाढ! युद्धानंतर सुरू असलेल्या घसरणीला ब्रेक, सोनं ५५००ने तर चांदी ११००० रुपयांनी महाग

Karad News : कऱ्हाड - चिपळुण मार्गावरील अवजड वाहतुक बंद; महामार्गाच्या कामासाठी दोन महिने वाहतुकीत बदल

खरातचं कुटुंब परदेशात पलायनाच्या तयारीत? पतीचे कोट्यवधींचे व्यवहार माहिती नाहीत, पत्नीची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात

SCROLL FOR NEXT