Abdul Sattar Esakal
छत्रपती संभाजीनगर

Farmers Suicide: कृषीमंत्री अब्दुल सत्तारांच्या सिल्लोडमध्ये दोन शेतकऱ्यांची आत्महत्या!

काय घडलंय नक्की जाणून घ्या सविस्तर

सकाळ डिजिटल टीम

औरंगाबाद : कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या सिल्लोड मतदारसंघात दोन शेतकऱ्यांनी सततच्या नापिकीला कंटाळून आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. खुद्द कृषीमंत्र्यांच्याच मतदारसंघात हा प्रकार घडल्यानं खळबळ उडाली आहे. (Two farmers committed suicide in Constituency of Minister Abdul Sattar)

सूत्रांच्या माहितीनुसार, सिल्लोड तालुक्यातील अंधारी येथे गळफास घेऊ आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. एकापाठोपाठ एक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मोठ्या प्रमाणावर कर्जबाजारी झाल्यानं तसेच सततच्या नापिकीमुळं हैराण झाल्यानं या शेतकऱ्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं आहे. शुक्रवारी (दि. ३) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास उघडकीस आली.

भागिनाथ बाळवा पांडव (वय) ४६, जनार्दन सुपडू तायडे (वय ५५) असं आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांची नावं आहेत. भागिनाथ पांडव यांच्याकडे तीन एकर शेती आहेत. त्यात त्यांनी टरबुजाची लागवड केली होती. मात्र, अपेक्षित उत्पादन झाले नाही, यामुळं कर्ज फेडायचे कसं? यामुळं ते तणावात होते. त्यांनी शुक्रवारी शेतातील घरासमोर असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये शुक्रवारी गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून शवविच्छेदनासाठी सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला. याप्रकरणी आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

हे ही वाचा : तुमच्याकडं कागदी स्वरुपातले शेअर आहेत? मग हे वाचाच...

शनिवारी (ता. ४) जनार्दन तायडे यांनी झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. सदरील घटना रविवारी सकाळी निदर्शनास आली. नातेवाइकांच्या म्हणण्यानुसार ते ठोक्याने जमीन कसायचे यात त्यांना अपेक्षित उत्पन्न मिळालं नसल्यामुळं ते सतत चिंतेत होते. यातून त्यांनी हे पाऊल उचलले. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली. मृत शेतकऱ्यावर शनिवारी अंत्यसंस्कार करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange: ''टॉयलेट्सला कुलूपं, पाणी नाही, खाऊ गल्ल्या बंद.. फडणवीस साहेब त्रास देऊ नका'', जरांगेंचा मुख्यमंत्र्यांना इशारा

Crime News : 'अश्लील रील्स बनवणं बंद कर' म्हटल्याने संतापली पत्नी... पतीवर चाकूने केला हल्ला...धक्कादायक घटना समोर

Latest Maharashtra News Updates live: मुसळधार पावसामुळे ५० वर्ष जुने झाड कोसळले, सुदैवाने जीवितहानी टळली

Nagpur Crime : बोलण्यास नकार दिल्याने चाकूने केले गळ्यावर, पोटावर वार; अल्पवयीन प्रियकराने प्रेयसीला संपविले

Pune Crime : बोलण्‍यास नकार; बाणेरमध्‍ये प्रेयसीवर गोळीबाराचा प्रयत्‍न, आरोपी पसार

SCROLL FOR NEXT