crime in aurangabad 
छत्रपती संभाजीनगर

प्रेमास नकार दिल्याने अल्पवयीन मुलीचे अपहरण, दोघा आरोपींना तीन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

सुषेन जाधव

औरंगाबाद : प्रेमास नकार दिल्याने अल्पवयीन मुलीचे अपहरण करणाऱ्या दोघांना तीन वर्षे सक्तमजुरी आणि प्रत्येकी पाच हजार रुपयांचा दंडाची शिक्षा विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एस. भिष्मा यांनी ठोठावली आहे. सागर परदेशी (१९) आणि गणेश राठोड (१८, दोघे रा. बालानगर, पाचोड रोड, अंबड) अशी आरोपींची नावे आहेत. या प्रकरणात १६ वर्षीय पीडितेने दिलेल्या फिर्यादीनुसार ५ मे २०११ रोजी फिर्यादी मुलगी ही क्लासवरुन घराकडे परतत असताना बळीराम पाटील हॉस्टेलजवळ तिला तिचा मावस भाऊ भेटला, त्याने अल्पवयीन मुलगा तुला भेटण्यासाठी येणार असल्याचे सांगितले.

मात्र फिर्यादीने नकार दिल्याने मावस भाऊ तेथून निघून गेला. काही वेळाने अल्पवयीन मुलासह वरील दोघे आरोपी एका दुचाकीवर तेथे आले. प्रेम करण्यास नकार देते का म्हणत आरोपी सागरने तिला बळजबरी दुचाकीवर तिघांच्या मध्ये बसविले. त्यानंतर आरोपी फिर्यादीला घेऊन प्रथम कचनेरला (ता. औरंगाबाद) गेले व तेथून जालन्याकडे निघाले. जालन्याकडे जाताना एका दुचाकीवर चौघे असल्याने पोलिसांनी त्यांना हटकले व त्यांची गाडी थांबवली. पोलिसांनी चौकशी करताच फिर्यादीने घडलेली सर्व घटना सांगितली. त्यानंतर पोलिसांनी चौघांना जालना पोलिस ठाण्यात आणले. घटनेची माहिती सिडको पोलिसांना दिली. प्रकरणात सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.


सहा साक्षीदारांचे नोंदविले जबाब
प्रकरणात तत्कालीन उपनिरीक्षक बी. यू. बोडखे यांनी तपास करुन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सुनावणी वेळी अतिरिक्‍त जिल्हा सरकारी वकील सतीश मुंदवाडकर यांनी सहा साक्षीदारांचे जबाब नोंदवले. दोन्ही बाजूंच्या युक्तिवाद व साक्ष-पुराव्यांवरुन न्यायालयाने दोघा आरोपींना दोषी ठरवून तीन वर्षे सक्‍तमजूरी आणि प्रत्येकी पाच हजारांच्या दंडाची शिक्षा ठोठावली. प्रकरणात अ‍ॅड. मुंदवाडकर यांना अ‍ॅड. राधेशाम नरोटे यांनी सहाय केले.

संपादन - गणेश पिटेकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Cylinder Booking Rules : एलपीजी बुकिंगच्या नियमात मोठा बदल, आता ३५ दिवसांनंतरच बुक करता येईल सिलिंडर

आजचे राशिभविष्य - 25 मार्च 2026

Gas Cylinder Shortage Impacts Small Businesses : धक्कादायक! गॅस सिलिंडरच्या टंचाईमुळे त्रस्त झालेल्या हॉटेल व्यावसायिकानं हॉटेलमध्येच घेतला गळफास

Ajit Pawar Plane Crash : अजित पवार अपघातप्रकरणी नवी अपडेट समोर, सहवैमानिकाचे ‘ओह शीट’ उद्‍गार; कटकारस्थान केल्याचा गंभीर आरोप

Chhatrapati Sambhajinagar:‘आदर्श’मध्ये अजूनही ३३८ कोटी अडकलेले ; साडेतीन वर्षांत दहा टक्केही कर्ज वसुली नाही

SCROLL FOR NEXT