Aurangabad News 
छत्रपती संभाजीनगर

औरंगाबादेत पुन्हा दोनजण कोरोना पॉझिटिव्ह, रुग्णसंख्या 42 वर

मनोज साखरे

औरंगाबाद : औरंगाबादेत आणखी दोन जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यात भीमनगर-भावसिंगपुरा येथील 27 वर्षीय तरुण आणि आसेफिया कॉलनी येथील 38 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. यांनाही पूर्वीच्या रुग्णांपासून लागण झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

यापूर्वी दोन 45 वर्षीय रुग्ण महिलांची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. एक महिला रुग्ण समतानगर येथील, तर दुसरी भीमनगर, भावसिंगपुरा येथील आहे. त्यामुळे शहरातील रुग्णसंख्या 42 वर पोचली आहे, अशी माहिती जिल्हा रुग्णालयाचे डॉ. प्रदीप कुलकर्णी यांनी दिली.

समतानगर येथील रुग्णसंख्या सहावर

समतानगर हा भाग शहरातील कोरोनाचा हॉटस्पॉट ठरला असतानाच, भीमनगर भावसिंगपुरा येथील 76 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला होता. या महिलेच्या मृत्यूनंतर लाळेच्या चाचणीचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला होता. तर त्या महिलेच्या अंत्यविधीला शंभरच्या आसपास लोकांनी गर्दी केली होती. या भागात रुग्णांची संख्या आता तीन झाली आहे. 

औरंगाबाद कोरोना मिटर 

एकूण रुग्णसंख्या - 42
कोरोनामुळे मृत्यू - 05
उपचार घेत असलेले -15 रुग्ण 
बरे होऊन घरी गेलेले रुग्ण - 22

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange: धनगर आरक्षणासाठी मनोज जरांगे आझाद मैदनात! बोऱ्हाडेंना पाठिंबा; म्हणाले, सहा कोटी मराठे...

IPL 2026 Rule: आता 'चेंडू' अनफिट होणार, आयपीएल पाहताना मजा येणार! दुसऱ्या डावामध्ये कॅप्टन बॉल बदलण्याची मागणी करणार...

बीएमसीचा ऐतिहासिक निर्णय! हजारो कर्मचाऱ्यांना मिळणार कायमस्वरूपी घर; पण कोणत्या? जाणून घ्या...

शेअर मार्केटच्या नावाखाली कोट्यवधींची फसवणूक; मुख्य आरोपी वर्षभरानंतर अटकेत

Gas News : गॅस टंचाईमुळे ओतूर-माळशेज पट्ट्यात पुन्हा पेटल्या चुली

SCROLL FOR NEXT