Aurangabad News 
छत्रपती संभाजीनगर

औरंगाबादेत आणखी दोन कोरोना पॉझिटिव्ह, संख्या वीसवर

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : औरंगाबाद शहरात आणखी दोन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. सातारा परिसरातील ४० वर्षीय महिला आणि हडकोच्या यादवनगर परिसरातील २९ वर्षीय तरुणाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे शहरातील रुग्णसंख्या आता २० वर गेल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी यांनी सांगितले. 

औरंगाबाद शहरात शुक्रवारी (ता. 10) दिवसभर कोरोनाचा एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळला नाही. मात्र रात्री उशिरा शहरात सातारा-देवळाई परिसरात राहणाऱ्या एका 40 वर्षीय महिलेचा आणि हडको एन -11 यादवनगर भागात राहणाऱ्या 29 वर्षीय तरुणाचा स्वॅब रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. 

शुक्रवारी एकही रुग्ण न आढळल्यामुळे औरंगाबादकरांना थोडा दिलासा मिळाला होता. पण सलग चौथ्या दिवशी रुग्णसंख्येत भर पडल्यामुळे आरोग्य यंत्रणेपुढील चिंचा वाढली आहे. 

मिनी घाटीत 75 रुग्णांची तपासणी; 57 भरती 

जिल्हा सामान्य रूग्णालयात (मिनी घाटी) आज 75 रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 13 जणांना कोरोनासारखी लक्षणे आढळल्याने  घरातच अलगिकरणात राहण्याचा सल्ला त्यांना दिल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुंदर कुलकर्णी यांनी सांगितले.

तसेच नवीन 57 जणांना रुग्णालयात भरती करण्यात आले.एकूण 57 जणांच्या लाळेचे नमुने तपासणीसाठी घाटी येथे पाठविलेले आहेत. काल आणि आजचे मिळून 42 जणांचे तपासणी अहवाल नकारात्मक आले आहेत. तेथील 72 तपासणी अहवाल येण्याच्या प्रतीक्षेत आहेत. 

सध्या एकूण 15 कोरोनाबाधित रुग्णांवर मिनी घाटीत उपचार सुरू आहेत. तर देखरेखीखाली ठेवण्यात आलेल्या रुग्णांपैकी 42 रुग्णांना त्यांच्यावर पूर्ण उपचारानंतर सुटी देण्यात आल्याचेही डॉ. कुलकर्णी म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Milk Price Hike: दसरा-दिवाळीआधीच दूध महागणार? तब्बल 8 रुपयांची वाढ! सरकारला 3 दिवसांचा अल्टिमेटम

Nagpur Longest Flyover : गडकरींचा ड्रीम प्रोजेक्ट पूर्ण! इंदोरा ते दिघोरी 8.9 किमीचा प्रवास आता सुसाट; उड्डाणपुलाला मिळणार डॉ. हेडगेवार यांचे नाव, जाणून घ्या नवीन पुलाविषयी...

६ महिन्यांच्या चिमुकल्यावर कुत्र्याचा हल्ला, पिटबुल नव्हे तर American Bully; मालक म्हणाला, उपचारावर ४ लाख खर्च केले

Ajit Agarkar Salary : अजित आगरकरने BCCI कडून किती पगार घेतला? त्याच्या कार्यकाळात भारताची कामगिरी कशी झाली? Report Card

Latest Marathi News Update : सोने दरात आणखी वाढ, सोने दिड लाखांवर

SCROLL FOR NEXT