Aurangabad Accident News esakal
छत्रपती संभाजीनगर

Aurangabad Accident | चहा पिण्यासाठी जात असताना अपघात, दोन तरुणांचा मृत्यू

जयेश व मधुर हे दोन्ही तरुण नर्सिंगचे शिक्षण घेत होते.

देवदत्त कोठारे

खुलतााबाद (जि.औरंगाबाद) : औरंगाबादहून येथून दुचाकीवर चहा पिण्यासाठी येणाऱ्या दोन तरुणांचा जागीच मृत्यु झाल्याची घटना मंगळवारी (ता.२१) सायंकाळी साडेसहाच्या दरम्यान घडली. जयेश निरंजन घोरपडे (वय २२, रा. पहाडसिंगपुरा, औरंगाबाद) व मधुर बाळासाहेब भडंगे (वय २३, रा.धन्वंतरी नगर, सातारा परिसर, औरंगाबाद) अशी मृतांची नावे आहेत. या बाबत अधिक माहिती अशी, की औरंगाबाद (Aurangabad) येथून दोघे जण दोन मोटारसायकलवरुन औरंगाबाद-खुलताबाद रस्त्यावरील कागजीपुरा येथे चहा पिण्यासाठी येत होते. (Two Nursing Students Died In Accident In Khultabad Taluka Of Aurangabad)

दोन्ही तरुण नर्सिंगचे शिक्षण (Nursing Education) घेत होते. मात्र भरधाव वेगात असलेल्या दुचाकीचा ऐन वळणावर ताबा सुटल्याने दुचाकी रस्त्याच्या कडेला असलेल्या पाटीला जोरदार धडकली. यात या दोन तरुणांचा जागीच मृत्यु झाला. या अपघातामुळे खुलताबाद-औरंगाबाद रस्त्यावरील रहदारी काही काळ विस्कळित झाली होती.

घटनास्थळी खुलताबाद पोलीस ठाण्याचे निरीक्षक भुजंग हातमोडे सहकाऱ्यांसह भेट देत रहदारी सुरुळीत केली. या दोन युवकांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी खुलताबाद रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jio IPO: जिओ प्लॅटफॉर्म्स आयपीओचा जागतिक महाविक्रम; १ कोटींहून अधिक अर्जांचा टप्पा ओलांडणारा जगातील पहिलाच आयपीओ

Manoj Jarange Patil : कथित ५०० कोटींच्या व्यवहाराची एसआयटीमार्फत निष्पक्ष चौकशी करा; मराठा आंदोलनाबाबतच्या आरोपांवर मनोज जरांगे-पाटील यांची मागणी

WHO IS JINTIMANI KALITA?: कोण आहे जिंतिमणी कलिता? झिम्बाब्वेविरुद्ध भारताकडून आंतरराष्ट्रीय पदार्पण, हरमनप्रीत कौरने दिली खास कॅप

Marathi News Live Updates: नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक; दुपारी २ वाजेपर्यंत ३८.८८ टक्के मतदान

Nilanga News : निलंगा तालुक्यात रेशनधारकांना दुष्काळात तेरावा महिना; गोदामातूनच ५० किलोच्या कट्ट्यात मिळतोय ४५ ते ४६ किलो धान्यसाठा

SCROLL FOR NEXT