3crime_201_163
3crime_201_163 
छत्रपती संभाजीनगर

दोन चोरट्यांना अटक, दीड लाख रुपये किमतीच्या सहा दुचाकी जप्त

रामराव भराड

वाळूज (जि.औरंगाबाद) :  वाळूज औद्योगिक वसाहतीसह अन्य ठिकाणाहून दुचाकी चोरी करणाऱ्या दोन संशयित चोरांना वाळूज एमआयडीसी पोलिसांनी रविवारी (ता. ११) अटक केला. त्यांच्या ताब्यातून १ लाख ५५ हजार रुपये किमतीच्या सहा दुचाकी जप्त केल्या आहेत. पोलिस निरीक्षक मधुकर सावंत यांना रविवारी मिळालेल्या माहितीवरून सहायक पोलिस निरीक्षक गौतम वावळे व कर्मचारी यांनी सापळा रचून वाळूज औद्योगिक परिसरातील रांजणगाव (शेणपुंजी) येथील सखाराम तुकाराम जगताप (वय २९ वर्षे, रा. ओमसाईनगर) व प्रताप विष्णू कोरडे (वय २९ वर्षे, रा. माऊलीनगर, कमळापूर रोड) यांना ताब्यात घेऊन विचारपूस केली.

त्यावेळी त्यांनी रांजणगावसह (शेणपुंजी) इतर ठिकाणाहून सहा दुचाकी चोरी केल्याचे कबूल केले. त्यांनी सांगितल्याप्रमाणे एक शाइन, एक पल्सर, एक हीरो स्प्लेंडर प्रो तसेच बदनापूर पोलिस ठाणे हद्दीतील एक स्लेंडर प्लस व पोलिस ठाणे साखरखेर्डा येथील स्प्लेंडर प्रो. असे सहा गुन्हे उघडकीस आले आहेत. पोलिसांनी १ लाख ५५ हजार रुपये किमतीच्या एकूण सह दुचाकी जप्त केल्या. संशयिताकडून आणखी दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असल्याचे पोलिस निरीक्षक मधुकर सावंत यांनी सांगितले.

ही कामगिरी पोलिस आयुक्त निखिल गुप्ता, पोलिस उपआयुक्त निकेश खाटमोडे, सहाय्यक पोलिस आयुक्त, विवेक सराफ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक मधुकर सावंत, सहाय्यक पोलिस निरीक्षक गौतम वावळे, रमाकांत पटारे, मोहन पाटील, खय्युमखाँ पठाण, रेवन्नाथ गवळे, नवाब शेख, विनोद परदेशी, सुधीर सोनवणे, हरिकराम वाघ, बंडू गोरे, दीपक चव्हाण, दीपक मतलबे यांनी केली आहे.


संपादन - गणेश पिटेकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT