Aurangabad Accident esakal
छत्रपती संभाजीनगर

Aurangabad Accident : पैठणमध्ये वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

त्याच्या डोक्याला गंभीर मार लागून तो घटनास्थळीच ठार झाला.

हबीबखान पठाण

पाचोड (जि.औरंगाबाद) : वेगातील अज्ञात वाहनाने समोरुन येणाऱ्या  दुचाकीला जोरीची धडक दिल्याने झालेल्या या भीषण अपघातात एक जागीच ठार, तर दुसरा गंभीर जखमी झाल्याची घटना पैठण-शहागड रस्त्यावरील आपेगाव नजीक बुधवारी (ता.२९) रात्री साडेसात वाजेच्या दरम्यान घडली. मुस्ताक गुलाब कुरेशी (वय ४०, रा.विहामांडवा, ता.पैठण) असे मृत तरुणाचे नाव आहे तर सिराज रहेमान शेख (वय३४) हा जखमी झाला आहे. अधिक माहिती अशी की, विहामांडवा (ता.पैठण) येथील मुस्ताक कुरेशी आणि सिराज शेख हे दोघे मित्र  पैठणला काही कामानिमित्त गेले होते. तेथील कामे आटोपून पैठणहून (Paithan) विहामांडव्याकडे दुचाकीवरुन (एमएच २० बीबी २८४०) गावाकडे परत  येत असताना पैठण-शहागड रस्त्यावरील (Aurangabad) आपेगाव जवळील आयकॉन पॅराडाईज इंग्लिश स्कूलसमोर येताच समोरुन आलेल्या अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली.(Two Wheeler Rider Died In Accident In Paithan in Aurangabad)

ही धडक इतकी भीषण होती की, मुस्ताक कुरेशीच्या डोक्याला गंभीर मार लागून तो घटनास्थळीच ठार झाला तर पाठीमागे बसलेला सिराज शेख हा जखमी झाला. घटनास्थळी रक्ताचा सडा पडला होता. हा अपघात घडताच मोठा आवाज झाला. त्यामुळे स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्तांना तात्काळ खासगी वाहनाद्वारे पैठणच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले असता यावेळी उपस्थित वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मुस्ताक कुरेशी यास तपासून मृत घोषीत केले तर जखमी सिराज शेख यांच्यावर उपचार सुरू आहे.

या अपघाताची माहिती मिळताच पैठण पोलीसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तसेच अपघातग्रस्तांच्या नातेवाईकांनी दवाखान्यात मोठी गर्दी केली होती. मृत मुस्ताक यांच्या पश्चाताप आई, पत्नी, तीन लहान मुलं असा परिवार आहे. या अपघाताने विहामांडवा परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pandharpur Darshan: पंढरपुरात विठ्ठल दर्शनासाठी पैसे घेतल्याचा धक्कादायक प्रकार; ऑडिओ क्लिप व्हायरल, अधिक मास सुरू होताच पंढरपुरात खळबळ..

Mumbai Goa Highway Toll Collection : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अपूर्ण, टोल वसुली सुरू; नितीन गडकरींच्या आवाहनाला केराची टोपली

लाईव्ह सामन्यात रवी शास्त्रींची मोठी चूक! नाणेफेकीच्या वेळी शुभमन गिलला काय बोलले?

Child Rescue Operation: पंजाबमध्ये कूपनलिकेतून नऊ तासांनंतर मुलगा बाहेर; घराबाहेर खेळताना पडला होता खड्ड्यात, होशियारपूरमध्ये थरारक रेस्क्यू ऑपरेशन!

Rajdhani Express धावत्या राजधानी एक्सप्रेसमध्ये आगीचा भडका, एसी कोच जळून खाक

SCROLL FOR NEXT