Uddav Thackeray 
छत्रपती संभाजीनगर

Aurangabad : बालेकिल्ल्यात शिवसैनिकांना किती बळ मिळणार!

पक्षफुटीनंतर उद्धव ठाकरे यांचा औरंगाबादेतून राज्यातील पहिलाच दौरा

- शेखलाल शेख

औरंगाबाद : शिंदे गटाच्या बंडानंतर सर्वाधिक सुरुंग लागला तो मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबाद जिल्ह्याला. सहा पैकी पाच आमदारांनी शिंदे गटाची वाट धरल्यामुळे गेल्या ३०-३५ वर्षांपासून बालेकिल्ला असलेला हा जिल्हा खिळखिळा झाल्याची परिस्थिती निर्माण होते की काय? असे चित्र होते.

एकीकडे पक्ष फुटला तर दुसरीकडे विरोधकांवर तुटून पडणाऱ्या नेत्यांवर घडीचा फास आवळला जात असल्याने उद्धव ठाकरे मुंबईत बसूनच पक्ष सावरण्याचा प्रयत्न करत होते. आता उद्धव ठाकरे यांनी रविवारी गंगापूर तालुक्यात नुकसानीची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला. या दौऱ्यामुळे आगामी महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकीसाठी शिवसैनिकांना किती बळ मिळते हे येत्या काही दिवसांत बघायला मिळेल.

अंधेरी पोट निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेना नाव आणि पक्षाचे धनुष्यबाण चिन्ह गमावल्यानंतर परतीच्या पावसाने झालेले नुकसान पाहण्यासाठी पहिल्यांदाच उद्धव ठाकरे मुंबईबाहेर पडले. अतिवृष्टीमुळे शेतकरी नाराज तर आहे, अशावेळी सरकारच्या विरोधातील चीड आणि आपल्याबद्दल असलेली सहानुभूती वाढवण्याठी उद्धव ठाकरे प्रयत्न करत आहे.

सत्ता गेल्यानंतर मुंबई बाहेरचा पहिलाच दौरा तो देखील मराठवाडा आणि ज्या जिल्ह्यातून सर्वाधिक आमदार शिंदे गटात गेले त्याच औरंगाबादची निवड हा निव्वळ योगायोग निश्‍चितच नाही. मराठवाड्याच्या अनेक जिल्ह्यांमध्ये अधिक नुकसान आणि चिंतेची परिस्थिती आहे. परंतु ठाकरेंनी पहिली पसंती दिली. ती कायम शिवसेनेच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या औरंगाबाद जिल्ह्याला.

गंगापूर तालुक्यात उद्धव ठाकरे यांनी भेट देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला. धीर सोडू नका, शिवसेना तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे, तातडीची मदत करायला सरकारला भाग पाडू; पण तुम्ही एकजूट कायम ठेवा, असे आवाहन करत ठाकरेंनी झालेल्या नुकसानीची नजर पाहणी केली. आमचे सरकार असताना बांधावर न येता देखील तुम्हाला मदत दिली होती, याची आठवण देखील त्यांनी आवर्जून करून दिली.

शिवसैनिकांना दिलासा

उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारमधील मंत्र्यांकडून टीका होऊ लागली आहे. पण या एकाच दौऱ्यातून उद्धव ठाकरे यांनी दोन गोष्टी साध्य केल्या. एक म्हणजे शेतकऱ्यांची सहानुभूती आणि पक्षफुटीनंतर हवालदिल झालेल्या शिवसैनिकांना बळ देण्याचे काम या दौऱ्यातून झाले. कुठलाही मेळावा किंवा सभा न घेता देखील या पाहणी दौऱ्यातून शिवसैनिकांना ऊर्जा मिळाली.

आगामी काळात औरंगाबाद महापालिका, जिल्हा परिषदेच्या निवडणुका होणार आहेत. उद्धव ठाकरे यांना जशी मुंबई महापालिकेची सत्ता महत्त्वाची आहे, तशीच औरंगाबादेत शिवसेनेचा वचक कायम ठेवण्यासाठी देखील इथे सत्तेची आवश्यकता आहे. त्या दृष्टीने उद्धव ठाकरे यांनी काही महत्त्वाचे संघटनात्मक बदल देखील केले. या दौऱ्यातून शिवसैनिकांना मात्र बळ मिळणार आहे. पक्ष फुटीनंतर मनाची घालमेल सुरू असलेल्या शिवसैनिकांना ठाकरेंच्या या दौऱ्यानंतर निश्चितच दिलासा मिळणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mohan Bhagwat: “पंचहात्तरीची शाल अंगावर पडते तेव्हा..”; मोहन भागवत यांच्या वक्तव्यामुळे राजकारणात खळबळ! कुणाला दिला सल्ला?

Latest Maharashtra News Updates : आलमट्टी उंचीविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार, महाराष्ट्राचे शिष्टमंडळ भेटणार जलमंत्र्यांना

Pune News : रात्रीतून शहर स्वच्छतेला अखेर सुरुवात; पुणे पालिकेकडून १४७२ कर्मचारी, २१३ वाहनांचा वापर

Satara Accident: उलटा धबधबा पाहायला गेलेला युवक मोटारीसह ३०० फूट खाेल दरीत; जखमी युवक वेदनेने ओरडत होता अन् पोलिस...

Kolhapur Municipal : कोल्हापुरात रस्त्यांची दुर्दशा, शहर अभियंतापदाचा खेळखंडोबा; सव्वा महिन्यात हर्षजित घाटगेंची बदली

SCROLL FOR NEXT