औरंगाबाद : कोरोनामुळे यंदा गणेशोत्सवावर परिणाम झाला आहे. राज्य सरकारने गणेशोत्सवासाठी नियमावली ठरवून दिली आहे. यंदा शाडूच्या गणेशमूर्ती बसविण्याकडे सर्वांचा कल होता. असे असले तरी अनेकांनी ‘पीओपी’च्या गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना केली आहे. यंदा सार्वजनिक गणेश विसर्जन होणार नाही. यामुळे ‘पीओपी’च्या मूर्ती ‘अमोनियम बायकार्बोनेट’ (बेकरी सोडा)च्या माध्यमातून घरीच विसर्जित करता येऊ शकतात, असे तज्ज्ञांनी सांगितले.
राज्य सरकार व महापालिकांचे सार्वजनिक ठिकाणी गणेश विसर्जन करण्यास मनाई केले आहे. यंदा महापालिकेचे कर्मचारी मूर्ती गोळा करून विसर्जित करणार आहेत. असे असले, तरी शाडू मातीच्या मूर्ती व प्लास्टर ऑफ पॅरिसच्या (पीओपी) गणेशमूर्तींचे घरीच विसर्जन करीत आनंद घेऊ शकतो. ज्योतीनगरात कृत्रिम तलाव तयार करीत त्यात अमोनियम बायकार्बोनेटचा वापर करीत गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात येत आहे. यंदा घरच्या घरी गणेशमूर्तींचे विसर्जन करण्याचे आवाहन महापालिकेतर्फे केले जात आहे.
‘पीओपी’च्या गणेशमूर्तींचे असे करा घरीच विसर्जन
गणेशमूर्ती विसर्जनासाठी शाडू मातीची मूर्ती पाण्यात विरघळते व मातीशी एकरूप होते; मात्र ‘पीओपी’ची मूर्ती वातावरणास हानिकारक आहे. या मूर्तींच्या विसर्जनासाठी एक भांड्यात अथवा बकेटमध्ये पाणी घ्या, त्यानंतर मूर्तीचे जेवढे वजन आहे तेवढेच ‘अमोनियम बायकार्बोनेट’ त्या पाण्यात टाका. त्या पाण्यात योग्यप्रकारे मिसळून तो हलवून घ्या. त्यानंतर मूर्ती त्यात सोडा. पहिल्या एका तासात मूर्तीचा रंग जातो. त्यानंतर प्लास्टर ऑफ पॅरिस विरघळण्यास सुरवात होते. चोवीस तासांत ही मूर्ती विरघळते. मूर्ती विरघळलेल्या पाण्याचे अमोनियम फॉस्फेट खत तयार होते. याचा वापर बागेतील झाडांना होऊ शकतो. त्यानंतर उरलेल्याचा वापर खडूसाठी केला जातो. साधारणतः ‘अमोनियम बायकार्बोनेट’ हे साधारणतः बेकरीत तयार होणाऱ्या पदार्थांत वापरला जातो. हे जुन्या मोंढ्यात मिळू शकते, असेही तज्ज्ञांनी सांगितले.
प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती नष्ट होत नाहीत. पीओपीपासून मूर्तींसह अनेक खेळणी करतात. यासह हे फ्रॅक्चरसाठी करण्यात येणाऱ्या प्लास्टरसाठीही वापरले जाते. पीओपीची पावडर नाकावाटे शरीरात गेल्यास अस्थमा, फुप्फुस डॅमेज होणे यासह कॅन्सर होण्याची शक्यता असते. पीओपी नष्ट होत नाही. विरघळून ते लिक्विड बनते. यामुळे पीओपी न वापरणे हाच उपाय आहे.
- कॅप्टन प्रा. डॉ. सुरेश गायकवाड, केमिस्ट्री विभाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ
यंदा सार्वजनिक गणेश विसर्जन करण्यास मनाई असल्याने महापालिकेच्या कर्मचाऱ्याकडे देऊन मूर्ती विसर्जित करावी अथवा ‘अमोनियम बायकार्बोनेट’च्या मध्यमातून घरीच गणेश विसर्जन करता येईल. पीओपी मूर्ती विसर्जनासाठी आम्ही कृत्रिम तलाव बनवून दरवर्षी विसर्जित करीत आहोत.
- गिरजाराम हळनोर, माजी नगरसेवक
Edit- Pratap Awachar
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.