Sambhaji Nagar  
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar : गुप्त बैठकीनंतर उत्तर प्रदेश ATSकडून १४ जणांना समन्स; लखनौला हजर राहण्याचे आदेश

या संशयितांपैकी ११ जणांना १५ ते १८ जानेवारीदरम्यान चौकशीसाठी लखनौ येथील एटीएसच्या मुख्यालयात हजर राहण्याबाबत समन्स बजावण्यात आले आहेत.

रोहित कणसे

छत्रपती संभाजीनगर : मराठवाडा मुक्तिसंग्राम सोहळ्याच्या कालावधीत बैठक घेऊन त्यात आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी तसेच ‘इसिस’ या दहशतवादी संघटनेच्या विचारांनी प्रेरित असल्याचा ठपका ठेवत शहरातील १४ तरुणांविरुद्ध उत्तर प्रदेशातील दहशतवादविरोधी पथकाने लखनौ येथे दहशतवादविरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. ११ ऑक्टोबरला हा गुन्हा दाखल करण्यात आला होता

तसेच लखनौ एटीएसचे पथक दोन दिवस तपासासाठी येथे आले होते. या संशयितांपैकी ११ जणांना १५ ते १८ जानेवारीदरम्यान चौकशीसाठी लखनौ येथील एटीएसच्या मुख्यालयात हजर राहण्याबाबत समन्स बजावण्यात आले आहेत. तसेच एका संशयिताची घरझडती घेत मोबाइल जप्त करण्यात आला आहे.

एटीएसच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील मकसूद कॉलनी भागात १७ सप्टेंबरला म्हणजे मराठवाडा मुक्तिसंग्राम सोहळ्याच्या काळात काही तरुणांनी गोपनीय बैठक घेतली होती. या बैठकीत काही आक्षेपार्ह वक्तव्ये बाबरी मशीदसंदर्भात करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

या बैठकीची पूर्ण माहिती तेलंगणा पोलिसांना प्राप्त झाली होती. त्यांनी ती उत्तरप्रदेश एटीएसला दिली. यावरुन एटीएसने लखनौ येथील गोमतीनगर पोलिस ठाण्यात १४ संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे. या गुन्ह्यामध्ये बैठक घेणारा प्रमुख संशयित हा ‘इसिस’च्या विचारांनी प्रेरित आहे. तसेच सोशल मीडियावर नेहमी आक्षेपार्ह पोस्ट टाकतात आणि हे सर्व संशयित जानेवारी २०२४ मध्ये देशविघातक कृत्ये करू शकतात, असा ठपका ठेवण्यात आला आहे.

दरम्यान, या प्रकरणी लखनौ एटीएसचे पथक २९ ते ३१ डिसेंबरदरम्यान शहरात आले होते. या पथकाने महाराष्ट्र एटीएसच्या पथकाला सोबत घेत १४ पैकी ११ संशयितांना समन्स बजावले आहे. या समन्समध्ये या संशयितांना १५ ते १८ जानेवारीदरम्यान लखनौच्या मुख्यालयात चौकशी तपासकामी हजर राहण्याचे आदेश बजावण्यात आले आहेत.

प्रमुख संशयिताची घरझडती, मोबाइल जप्त

गुन्ह्यातील प्रमुख संशयित मेडीकल दुकानावर सेल्समन आहे. त्याच्यावर एटीएसने पूर्ण ठपका ठेवला आहे. या संशयिताची घरझडती घेण्यात आली असून मोबाईल जप्त करण्यात आला असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कर्णधार पृथ्वी शॉ फेल, महाराष्ट्राच्या संघाला १५४ धावांचा पाठलागही जमेना! SMAT 2025 स्पर्धेत तिसरा पराभव

Crime: एक भीती अन् वडिलांची असहाय्यता... पित्यानं लेकीला अंधाऱ्या खोलीत २० वर्ष कैद केलं, हादरवणारं कारण समोर

Sangli Water Crisis : अशुद्ध पाण्याने किल्लेमच्छिंडगडचे नागरीक त्रस्त; किडनी स्टोनचा धोका वाढतोय!

IndiGo: इंडिगोचं चाललंय काय? 300 पेक्षा जास्त विमानं रद्द; DGCA पासून मंत्रालयापर्यंत बैठकांचा धडाका, आतापर्यंतचे सर्व अपडेट्स

Latest Marathi News Live Update : हिवरखेड प्रा.आ.केंद्रात अवैध गर्भपाताची शक्यता

SCROLL FOR NEXT