शिऊर (जि.औरंगाबाद) : सावखेड (खं) या रस्त्यावरील पाण्यात अर्धनग्न जलआंदोलन करताना रहिवासी.  
छत्रपती संभाजीनगर

वैजापूर तालुक्यात रस्त्यासाठी अर्धनग्न जल आंदोलन

रमेश राऊत

शिऊर (जि.औरंगाबाद) : शिऊर ते सावखेड(खं) (ता.वैजापूर) (Vaijapur) या तीन किलोमीटर रस्त्याची पुरती वाट लागली असून या रस्त्यावरील रहिवासी नागरिकांना मरणयातना सहन करावे लागत आहे. या रस्त्याचे काम तात्काळ करण्यात यावे, या मागणीसाठी शुक्रवारी (ता.17) मराठवाडा मुक्ती संग्रामदिनी याच रस्त्यावर असलेल्या पाण्यात येथील नागरिकांनी अर्धनग्न जलआंदोलन केले. बांधकाम विभागाच्या आश्वासनानंतर जलआंदोलन मागे घेण्यात आले. शिऊर (ता.वैजापुर) परिसरातील बागायदार वस्ती, किटे वस्ती, जाधव वस्ती, तुपे वस्ती, वरपे वस्ती व सावखेड ( खं) रस्ता येथील रहिवासी असून शिऊर ते सावखेड (खं)या तीन किमी रस्त्याची प्रचंड दुरावस्था झाली (Aurangabad) असून या रस्त्याने दळणवळण करणे कसरतीचे ठरत आहे. या रस्त्याचे काम मार्गी लावावे या बाबत सातत्याने पाठपुरावा करत आहोत. मात्र प्रशासन व लोकप्रतिनिधी यांच्याकडून दखल घेतली जात नाही.

यामुळे उद्विग्न झालेल्या येथील ग्रामस्थांनी अखेर आक्रमक पवित्रा घेत अर्धनग्न जलआंदोलन केले. शिऊर हे वैजापूर तालुक्यातील सर्वात मोठ्या बाजारपेठेचे गाव असून या गावाला दैनंदिन संपर्क असतो. यात आठवडी बाजार, पोलीस ठाणे, बँक, शाळा-महाविद्यालय, आरोग्यासह विविध सुविधा शिऊरला असल्याने परिसरातील खेड्यातील नागरिकांची कायमच वर्दळ असते. दळणवळणासाठी महत्त्वाच्या असणाऱ्या रस्त्यांची मात्र चाळणी झाल्याने विद्यार्थी , रुग्ण, अपंग यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. शिऊर ते बागायतदार वस्तीमार्गे जाणाऱ्या सावखेडा रस्त्यालाच मरणयातना भोगाव्या लागत असून या रस्त्याचे डांबरीकरण व मजबुतीकरण करण्यात यावे. यासाठी कित्येकदा अर्ज, विनंती, निवेदन देण्यात आले. कायम या मागणीला केराची टोपलीच दाखविल्याने या रस्त्याची स्थिती जैसे थे राहिली. सध्या पावसाळ्याचे दिवस असून या रस्त्यावर पूर्ण पानी व चिखलाचे साम्राज्य आहे, यामुळे या रस्त्यावरून वाहतूक पूर्णपणे बंद असून मोठ्या अडचणीतून मार्ग काढावा लागत आहे. या रस्त्याचे काम मार्गी लावण्यासाठी जिल्हा परिषदेकडे आठ दिवसात प्रस्ताव देण्यात येईल, असे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिल्यावर हे आंदोलन मागे घेण्यात आले.

एकीकडे मराठवाडामुक्ती संग्रामदिनी हुताम्याना अभिवादन करण्यात येत असतांना दुसरीकडे मुलभूत हक्कासाठी ग्रामस्थांना असे आंदोलन करावे लागले. दरम्यान जिल्हा परिषदेच्या बांधकाम उपविभागाचे अभियंता के. टी. हत्ते, आय.एन. शेख, पोलीस ठाण्याचे सहायक फौजदार आर.आर.जाधव, अविनाश भास्कर, किरण रावते,के.पी पवार यांच्यासह पोलीस कर्मचारी उपस्थित होते. या अर्धनग्न जलआंदोलनात संजय जाधव, ग्रामपंचायत सदस्य बाळा पाटील,अनिल भोसले, अकबर शेख, सुनील खांडगौरे, विजय झिंजुर्डे, कृष्णा जाधव, बाळू पवार, पोपट जाधव, विश्वनाथ जाधव, अंकुश वरपे, देविदास किटे, दादासाहेब औटे, गोकुळ किटे, वाल्मिक किटे, दीपक जाधव, रामेश्वर जाधव, बाळू धनेश्वर, दादासाहेब जाधव, संतोष जाधव, रतन आगवान, मोतीराम आगवान, नवनाथ जाधव, महेश वरपे, भास्कर आगवान, शुभम देशमुख, बाबासाहेब पगार आदींसह येथील रहिवासी सहभागी झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

उड्डाणपुलाच्या कामावेळी मातीचा ढिगारा कोसळला, दोघांचा मृत्यू, तीन जण गंभीर

Shirwal Accident News: बर्थडेनंतर केलेला महाबळेश्वरचा प्लॅन, मध्यरात्री अपघातात ४ मित्रांचा मृत्यू; चौघेही बसलेले मागच्या सीटवर

Athani Crime News: पतीचा खून करून अपघाताचा केला बनाव, प्रियकराच्या मदतीने कृत्य

Marathi News Live Updates : कंत्राटदारांना राज्य सरकारचा चाप, कंत्राटासाठी वैध कामगिरी प्रमाणपत्र द्यावं लागणार

Mumbai Monsoon: मुंबईत आज मुसळधारेचा इशारा;वाहतूक सुरळीत; समुद्रात ४.६८ मीटर उंचीच्या मोठ्या लाटा

SCROLL FOR NEXT