Water
Water  sakal
छत्रपती संभाजीनगर

लातूर जिल्ह्यात पाण्याचा उपसा वाढला; १६ टक्के पाणी कमी झाले

हरी तुगावकर

लातूर : लातूर जिल्ह्यातील सिंचनाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या १४२ प्रकल्पांतील पाणीसाठ्याचा मोठ्या प्रमाणात उपसा होऊ लागला आहे. महिनाभरात १६ टक्के पाणीसाठा कमी झाला आहे. मांजरा धरणातील पाणीसाठादेखील दहा टक्क्यांनी कमी झाला आहे. सध्या काही भागात उसाला मोठ्या प्रमाणात पाणी दिले जात आहे. आणखी उन्हाळा सुरू व्हायचा आहे. सध्या अशी परिस्थिती असेल तर उन्हाळ्यात यापेक्षा अधिक उपसा होण्याचीच शक्यता आहे. त्यामुळे पाण्याचा योग्य वापर होण्याची गरज आहे.

लातूर जिल्ह्याच्या दृष्टीने दोन मोठे, आठ मध्यम व १३२ लघू असे एकूण १४२ प्रकल्प आहेत. गेल्या वर्षी पावसाळ्यात चांगला पाऊस झाला. त्यामुळे हे सर्व प्रकल्प पाण्याने तुडुंब भरले गेले. त्यात जलसंधारणाच्या कामामुळे जिल्ह्याची पाणी पातळीही साडेतीन मीटरने वाढली. पण, गेल्या एक दीड महिन्यापासून सर्वच प्रकल्पातील पाण्याचा मोठ्या प्रमाणात उपसा होताना दिसत आहे. जिल्ह्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या या १४२ प्रकल्पांचा एकूण प्रकल्पीय उपयुक्त पाणीसाठा हा ६९५.५३ दशलक्षघनमीटर इतका आहे. या सर्व प्रकल्पात ता. २७ जानेवारीला ५८०.३४ दशलक्षघनमीटर पाणीसाठा होता. म्हणजेच ८३.४४ इतके टक्के पाणीसाठा या प्रकल्पात होता. सातत्याने पाण्याचा उपसा होत राहिल्याने ता. तीन मार्चला या सर्व प्रकल्पात ४६७.२१ दशलक्षघनमीटर पाणीसाठा राहिला.

याची टक्केवारी ६७.१७ इतकी होती. म्हणजेच या प्रकल्पातील पाणीसाठा एक महिन्यात सुमारे १६.२७ टक्क्यांनी कमी झाल्याचे दिसून येत आहे. लवकरच उन्हाळा सुरू होणार आहे. उन्हाळ्यातदेखील मोठ्या प्रमाणात पाण्याचा उपसा केला जातो. अशाच पद्धतीने पाण्याचा उपसा होत राहिला तर भविष्यात पावसाने ओढ दिल्यानंतर टंचाईचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे आतापासूनच पाण्याचा योग्य वापर करण्याची गरज आहे. जिल्ह्यात सध्या उसाचा प्रश्न गंभीर आहे. मोठ्या प्रमाणात ऊस उभा आहे. कारखाने अधिक क्षमतेने गाळप करीत आहेत. उसाचे नुकसान होऊ नये म्हणून शेतकरी मोठ्या प्रमाणात पाणी देऊन ऊस जगवत आहेत. मोठ्या प्रमाणात पाणी उपशाचे हे कारण आहे. यावरही नियंत्रण ठेवण्याची गरज आहे.

मांजराची स्थिती

तारीख उपलब्ध टक्केवारी

पाणीसाठा

१३ जानेवारी १७३.२३ ९७.८९

२० जानेवारी १७२.३० ९७.३७

३ फेब्रुवारी १६५.८७ ९३.७३

१० फेब्रुवारी १६२.६९ ९१.९४

१८ फेब्रुवारी १५९.५५ ९०.१६

२४ फेब्रुवारी १५७.४१ ८८.९७

३ मार्च १५४.६४ ८७.३९

१४२ प्रकल्पाची स्थिती

तारीख उपलब्ध टक्केवारी

पाणीसाठा

२७ जानेवारी ५८०.३४ ८३.४४

१० फेब्रुवारी ५३१.८७ ७६.४७

१८ फेब्रुवारी ५११.२१ ७३.५०

२४ फेब्रुवारी ४९६.०० ७१.३१

३ मार्च ४६७.२१ ६७.१७

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

SRH vs RR Live IPL 2024 : दोन धक्क्यानंतर यशस्वी, रियाननं डाव सावरला; राजस्थान 10 षटकात शतक पार

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

Rohit Sharma Rinku Singh : पत्रकार परिषदेनंतर रोहित रिंकूला भेटला; केकेआरनं केलं ट्विट

SCROLL FOR NEXT