People Looted Watermelons In Aurangabad  esakal
छत्रपती संभाजीनगर

कलिंगडचा ट्रक उलटला, मदत करण्याऐवजी कलिंगड लुटण्यासाठी लोकांची झुंबड

अरे हे काय ! मदत करण्याऐवजी कलिंगड लुटण्यासाठीच लोकांनी केली गर्दी

हबीबखान पठाण

पाचोड (जि.औरंगाबाद ) : कलिंगड घेऊन जाणाऱ्या ट्रक चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने कलिंगडने भरलेला ट्रक धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील पाचोड जवळील डोमेगाव फाट्यावर रस्त्याच्या बाजूला पलटी झाल्याची घटना शुक्रवारी (ता.११) रात्री घडली आहे. या विषयी अधिक माहीती अशी की, औरंगाबादहून (Aurangabad) बीडकडे (Beed) कलिंगड घेऊन जाणाऱ्या ट्रक चालकाने ट्रकवरून अचानक नियंत्रण सुटल्याने ट्रक रस्त्याच्या कडेला उलटल्याने त्यातील कलिंगड रस्त्यावर विखुरले गेले. या अपघातामध्ये ट्रकचालक जखमी झाला होता. पण त्याला मदत करण्याऐवजी महामार्गावर येणाऱ्या जाणाऱ्या लोकांनी कलिंगड लुटायला सुरुवात केली.(Watermelon Truck Collided, People Crowded For Looting Fruits In Aurangabad)

ही बातमी काही क्षणाताच परिसरात वाऱ्यासारखी पसरली आणि आजूबाजूच्या परिसरातील लोकांची तिथे एकच गर्दी झाली. ज्याला मिळेल तितकी आणि जमेल तितकी कलिंगड घेऊन लोकं तिथून पसार झाली. काही जणांनी तर कलिंगड (Watermelon) नेण्यासाठी मोठ-मोठ्या गोण्याही आणल्या होत्या. बघता-बघता सर्व कलिंगड घेऊन लोक गायब झाली. जखमी अवस्थेतही ट्रकचालक लोकांना विनवणी करत होता. पण लोकांनी ना त्याला मदत केली ना त्याच्या विनवणीकडे लक्ष दिले. लाखो रुपयांचे नुकसान झाल्यान ट्रक चालकांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: पुण्यात सैराटपेक्षाची भयानक घटना! प्रेमविवाह केल्याचा मनात राग, तिघांनी सलूनचं सेटर लावलं अन् तरुणावर कोयत्याने वार

Pune News: अमली पदार्थ विरोधी पथकाची माेठी कारवाई! 'कोंढवा, बिबवेवाडीतून २७ लाखांची अफू', मेफेड्रोन जप्त; दोघांना अटक

Dhule News: जोडपं गाढ झोपेत असतानाच नियतीनं डाव साधला, सुखी संसार अर्ध्यावरच संपला; धुळ्यातील दुर्दैवी घटना

DY Chandrachud: माजी CJI चंद्रचूड अजूनही सरकारी बंगल्यातच, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला पत्र, मोठं कारण आलं समोर

परिवहन मंत्र्यांचे आदेश! 'शालेय विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या फेऱ्या रद्द करू नयेत'; सव्वापाच लाख प्रवासाचे पास वाटप

SCROLL FOR NEXT