औरंगाबाद - शहरात २९ कोरोनाग्रस्त रुग्ण सापडले. त्यामुळे शासनाने औरंगाबादला ‘रेड झोन’ म्हणून घोषित केले. असे असताना जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी एकदाही आढावा घेतला नाही. याबाबत ‘सकाळ’ने ‘कुणी सांगेल का, पालकमंत्री कुठे आहेत?’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले. त्याची दखल घेत पालकमंत्री सुभाष देसाई यांनी तातडीने जिल्हाधिकारी, पोलिस आणि महापालिका आयुक्तांकडून आढावा घेत औरंगाबादला हवी ती मदत मिळेल, असे स्पष्ट केले.
हे वाचले का ? कोरोना बरा होतो; मग एड्सपेक्षा धोकादायक का?
...तर परिस्थिती असती वेगळी
मंत्री श्री. देसाई यांची पालकमंत्री म्हणून निवड झाल्यानंतर त्यांनी तातडीने बैठका घेत हे करू, ते करू, अशा घोषणा केल्या; मात्र कोरोनाचे संकट लोकांचे जीव घेत असताना ते शहरात येण्याचे नाव घेईनासे झाले. ते प्रशासनाकडून काय आढावा घेतात, हे त्यांचे त्यांनाच माहीत! जिल्ह्यात प्रथम कोरोनाचा रुग्ण सापडला तेव्हापासून पालकमंत्री जिल्ह्यात कुठेही दिसले नाहीत. प्रशासनास योग्य निर्देश व मार्गदर्शन करण्यासाठी पालकमंत्री शहरात ठाण मांडून असते, तर वेगळी परिस्थिती असती; परंतु पालकमंत्री हे मुंबईचे असल्याने अशा परिस्थितीत उपस्थित नाहीत. औरंगाबादला स्थानिक पालकमंत्री असते तर सदरील पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत प्रशासन व्यवस्थित चालले असते, असे अनेक प्रश्न ‘सकाळ’ने उपस्थित केले. दरम्यान, हे वृत्त जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. देसाई यांच्यापर्यंत पोचताच त्यांनी शनिवारी (ता. १८) तातडीने महापालिका आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधला.
फोनवरून घेतला आढावा
औरंगाबाद शहरात कोरोना विषाणू संसर्ग आणि त्याच्याविरुद्ध लढ्याबाबत आढावा घेतला. यावेळी आयुक्त यांनी महानगरपालिकेतर्फे करण्यात आलेल्या उपाययोजनांबाबत सविस्तर माहिती दिली. यावेळी डॉ. देसाई यांनी मनपास जिल्हा प्रशासन आणि जिल्हा नियोजन समितीमार्फत पाहिजे ती मदत आणि निधी देण्याचे आश्वासन दिले. याशिवाय जिल्हाधिकारी व पोलिस आयुक्त यांच्याशीही फोनवरून परिस्थितीचा आढावा घेतला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.