police esakal
छत्रपती संभाजीनगर

Crime : पोलिसांना सलाम! छ. संभाजीनगर शहरात एकाच दिवसात 3 धार्मिक स्थळांची विटंबना पण...

पोलिसांची तत्परता आणि नागरिकांच्या संयमामुळे शांतता आणि सुव्यवस्था अबाधित

सकाळ डिजिटल टीम

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर शहरात एकापाठोपात तीन ते चार ठिकाणी धार्मिक स्थळांची विटंबना झाल्याचा प्रकार उघड झाला. यानंतर पोलीस प्रशासनाने तत्परता दाखवत तातडीने यातील महिलेला ताब्यात घेतले. तर घटनेनंतर नागरिकांनीही संयम दाखवल्याने वाद मिटला आहे.

शहरात शनिवारी सकाळी साडेनऊ वाजता एका महिलेने स्कूटरवरून येताना एका धार्मिक फोटोची विटंबना केली. त्यानंतर काही वेळात उस्मानपुरा, पुंडलिकनगर, जवाहरनगर हद्दीत अशाच घटना घडल्या पण घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्त मनोज लोहिया यांच्यासह वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. सीसीटीव्हीच्या अधारे सदर महिलेला फक्त दोन तासांत ताब्यात घेण्यात आले.

धार्मिक स्थळांची विटंबना करणारी महिला ही पोस्ट विभागात टपाल सहायक म्हणून कार्यरत असून तिला कुशलनगर पोस्ट कार्यालयातून ताब्यात घेतले आहे. सदर महिला ही मानसिक आजाराने त्रस्त असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी सदर महिलेविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, घटना घडल्यानंतर समाजात कोणत्याही प्रकारचा तेढ निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांनी तत्परता दाखवली होती. पोलिसांच्या तत्परतेमुळे समाजात कोणत्याही प्रकारचा तेढ निर्माण झाला नसून पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे.

त्यानंतर पोलीस आयुक्त लोहिया यांनी एक व्हिडिओ ट्वीटरवर शेअर करत "सदर महिला ही मानसिक आजाराने त्रस्त असून नागरिकांनी कोणत्याही अफवेवर विश्वास ठेवू नये. शहरातील शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी सहकार्य करावे" असं अवाहन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : राज्यात आज जोरदार पावसाची शक्यता, अनेक जिल्ह्यांत येलो अलर्ट जारी; तुमच्या भागात कसे असेल हवामान? जाणून घ्या

Maratha Reservation: समाजापासून मला दूर ठेवण्याचा सरकारचा कट; माढ्यातील इशारा सभेत मनोज जरांगे यांचा आरोप, आरक्षणाचा लढा सुरूच राहणार

अर्थभान : इमर्जिंग अर्थव्यवस्थांमध्ये भारत अव्वल

शाळांना यंदा ११ दिवस दिवाळी सुट्टी! शैक्षणिक वर्षात २३७ दिवस अध्यापनाचे अन्‌ शिक्षकांना १२८ दिवस सुट्ट्या; यंदा वार्षिक परीक्षा एप्रिलअखेर, वाचा...

Jharkhand Protest: झारखंडमध्ये भरती परीक्षांवरून आंदोलन पेटले; विद्यार्थी संघटना सीबीआय चौकशीच्या मागणीवर ठाम

SCROLL FOR NEXT