संग्रहित छायाचित्र 
छत्रपती संभाजीनगर

फेरमूल्यांकनात अधिकाऱ्यांचे काम सोपे, पण विद्यार्थ्यांची होणार धावपळ...का ते वाचा...

संदीप लांडगे

औरंगाबाद - यंदा कोरोनामुळे फेरमूल्यांकनासाठी बोर्डाने ऑनलाइन प्रक्रिया राबविण्याचे ठरवले आहे. या प्रक्रियेतून फक्त मंडळाचा फायदा होणार असून, विद्यार्थ्यांची मात्र धावपळ होणार आहे. त्यातून कोविडचा संसर्ग वाढण्याची शक्यता आहे. या प्रक्रियेसाठी आर्थिक बोजाही सहन करावा लागणार आहे. विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेता वाढीव गुण देण्याचा अधिकार फेरमूल्यांकन समितीला देण्यात यावा, अशी मागणी कनिष्ठ महाविद्यालय गणित शिक्षक कल्याण परिषदेने मंडळाकडे केली आहे. 

विद्यार्थ्यांची परवड 
पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाइन अर्ज केल्यानंतर विद्यार्थ्याला मेलवर उत्तरपत्रिका मिळेल. यामध्ये बोर्डाकडून विद्यार्थ्याला उत्तरपत्रिका, बोर्डाचे फॉर्म अशी एकूण तीस पाने पाठवण्यात येतील. प्रत्येक विद्यार्थ्यांच्या घरी प्रिंटर नाही. त्यामुळे या उत्तरपत्रिकेची मुलांना नेट कॅफेवर जाऊन प्रिंट काढावी लागेल. याचा वेगळा खर्च विद्यार्थ्याला येणार आहे. त्यानंतर विद्यार्थ्याला संबंधित विषयाच्या शिक्षकास शोधून त्यांच्याकडून ही उत्तरपत्रिका तपासून घ्यायची आहे. त्यानंतर बोर्डाच्या फॉर्मवर त्या शिक्षकाची स्वाक्षरी घेऊन मुख्याध्यापकाचा शिक्का व स्वाक्षरीदेखील घ्यायची आहे. त्यानंतर हा फॉर्म प्रत्यक्ष बोर्डात नेऊन जमा करायचा आहे. त्यावेळी गर्दीमुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

शिक्षक कोविडच्या ड्युटीवर 
कोरोनाचा पार्श्‍वभूमीवर बहुतांश शिक्षकांना कोरोना ड्युटीवर नियुक्त केलेले आहे; तसेच कोरोनामुळे शाळा, महाविद्यालये बंद असल्याने मुख्याध्यापक, शिक्षक शाळेवर जात नाहीत. त्यामुळे उत्तरपत्रिका तपासण्यासाठी विद्यार्थाने शिक्षक, मुख्याध्यापकांना कुठे शोधत फिरावे, असा प्रश्‍न विद्यार्थ्यांना पडला आहे. 

फेरमूल्यांकन समितीला द्या अधिकार 
झेरॉक्स कॉपीवर वाढीव गुण मिळवण्यासाठी विषय शिक्षक, परीक्षक आणि मुख्याध्यापक, प्राचार्य यांची शिफारस घेऊनच बोर्डातील पुनर्मूल्यांकन समितीकडे अंतिम निर्णयाचा अधिकार आहे. ही सर्व दीर्घ प्रक्रिया यावर्षी विद्यार्थी हिताच्या दृष्टीने योग्य नाही. याचे अधिकार पुनर्मूल्यांकन समितीला देण्यात यावा, अशी मागणी कनिष्ठ महाविद्यालय गणित शिक्षक कल्याण परिषदेने मंडळाकडे केली आहे.

संपादन ः प्रवीण मुके

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ZP member selection process : स्विकृत जिल्हा परिषद सदस्यपदांसाठी राज्यपालांकडून मंजुरी, इच्छुकांकडून जोरदार फिल्डिंग

Sanjaykaka Patil Sangli : संजयकाका पाटील पुन्हा भाजपवासीय होणार, चंद्रकांत दादा सुनेत्रा पवारांचे नाव घेत म्हणाले, तासगावचे राजकारण पुन्हा बदलणार

Mumbai News: मिठीतील भ्रष्टाचारावर प्रशासन गप्प का? स्थायी समितीत तीव्र पडसाद

IPL 2026: 'तूझे सिक्रेट्स अन् आतल्या गोष्टी माहितीयेत, त्यामुळे ...' वैभव सूर्यवंशीसोबतच्या चर्चांवर ईशान किशानचा खुलासा

श्रेया घोषालने 3 महिन्यात खरेदी केली 3 आलिशान घरं, किंमत ऐकून थक्क व्हाल, नेटवर्थ आहे तब्बल 'इतक्या' कोटींचं

SCROLL FOR NEXT