Chhatrapati Sambhajinagar Crime
Chhatrapati Sambhajinagar Crime Sakal
छत्रपती संभाजीनगर

धक्कादायक! भरदिवसा विद्यार्थिनीला मारहाण अन् शिवीगाळ; स्कार्फ ओढत काढली छेड | Chhatrapati Sambhajinagar Crime

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : मित्रांसोबत जात असताना एका विद्यार्थिनीचा परिसरातील टवाळखोरांनी पाठलाग करुन तिला मारहाण केली. कायदा व सुव्यवस्थेचे अक्षरश: धिंडवडे काढणारा हा प्रकार बेगमपुरा पोलिस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी (ता. २४) भरदिवसा घडला. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर बुधवारी (ता. २६) पोलिसांनी स्वत: फिर्यादी होत गुन्हा दाखल केला. त्यानंतर तीन टवाळखोरांना ताब्यात घेण्यात आले आहे.

छत्रपती संभाजीनगर शहरातील एक मुलगी मित्रासोबत बीबी-का-मकबरा पाहण्यासाठी गेली होती. तेथे आधीपासून असलेल्या टवाळखोरांची तीच्यावर नजर गेली. दरम्यान, तिच्यासोबत असलेला मित्र आणि ती वेगवेगळ्या धर्माचे असल्याचा कांगावा करत टवाळखोरांनी आणखी काही साथीदारांना बोलावून घेतले.

आपल्या आजूबाजूला टवाळखोर जमा होत असल्याचे त्या दोघांच्या लक्षात आले. त्यानंतर पीडितेसोबत फिरणाऱ्या तरुणाने तेथून काढता पाय घेतला. तरुणीही पायी घराकडे निघाली. तेव्हा पाच ते सहा जणांच्या टोळक्याने तिचा पाठलाग सुरु केला. तुझ्यासोबतचा मुलगा कोण होता?, तुझा मोबाइल दाखव, असे अनेक प्रश्न विचारून तिला शिवीगाळ सुरु केली. त्याचवेळी एकाने तिचा स्कार्फ जोरात ओढला, दुसरा तिची स्कूल बॅग हिसकावू लागला.

तिसरा टवाळखोर तिचा मोबाईल हिसकावत होता. यावेळी मुलगी जोरजोरात ओरडत होती. मला सोडा, जाऊ द्या अशी विनवणी करीत होती, पण टवाळखोरांपैकी कोणालाही तिची दया आली नाही. उलट त्यांनी तिला अश्लील शिवीगाळ करीत मारहाण केली. त्यानंतर तीचा मोबाईलही हिसकावून घेतला. या प्रकरणाचा संताप आणणारा व्हिडीओ बुधवारी (ता. २६) प्रचंड व्हायरल झाला. त्यानंतर या प्रकरणी पोलिसांनी फिर्यादी होऊन सहायक पोलिस निरीक्षक हरेश्वर घुगे यांनी गुन्हा दाखल केला.

एक मेकॅनिक, दुसरा मजूर

व्हिडिओ व्हायरल झाल्यावर शहर पोलिसांनी आपली बाजू मांडली. तरुणीच्या पालकांना तक्रार देण्याबाबत सांगितले मात्र, त्यांनी तक्रार देण्यास नकार कळविला. त्यावर पोलिसांनी स्वत:हून फिर्यादी होत बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. व्हिडिओवरून टवाळखोरांची ओळख पटवत आरोपींचा शोध सुरु केला.

उस्मानपुरा पोलिसांनी मजुरी करणाऱ्या शेख गयाज ऊर्फ बब्बू शेख रियाज (वय ३०, रा. फुलेनगर, उस्मानपुरा) याला ताब्यात घेतले. त्यानंतर बेगमपुरा पोलिसांनी नदीम खान फिरोज खान (वय २१, रा. मकबरा रोड, बेगमपुरा) आणि सुफियान खान मुसा खान (वय २१, रा. आसेफिया कॉलनी) या दोघांना अटक केली. सुफियान हा मेकॅनिक तर नदीम हा मजूर आहे. उर्वरित आरोपींचा शोध सुरु आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक श्री. तावरे यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis : युतीची सत्ता येताच उद्धवजींना मुख्यमंत्रिपदाचे वेध

आगळी दक्षिणकोंडी

‘लाट’विरहित निवडणुकीचा अन्वयार्थ...

मेंदूवर आदळणाऱ्या डिजिटल-प्रचारातून सुटलेलं काही...

एक दूसरे से करते है प्यार हम...

SCROLL FOR NEXT