Young Farmer Vijendra Deshmukh 
छत्रपती संभाजीनगर

घर कसे चालवायचे या चिंतेतून तरुण शेतकऱ्याने संपवले जीवन, विषारी कीटकनाशक घेऊन केली आत्महत्या

विकास पाटील

बनोटी (जि.औरंगाबाद) : अतिवृष्टीमुळे झालेले शेतीचे नुकसान, डोक्यावरील वाढलेल्या कर्जाचा भारासह परिवाराचा उदरनिर्वाह पुढे कसा चालवायचा या चिंतेने किन्ही (ता.सोयगाव) येथील तीसवर्षीय तरुण शेतकऱ्याने विषारी कीटकनाशक प्राशन करीत जीवन संपविल्याची दुर्दैवी घटना शनिवारी (ता.पाच) पहाटे घडली. मृताचे नाव विजेंद्र (ऊर्फ सोनू) सुरेश देशमुख असे आहे. किन्ही येथील लताबाई सुरेश देशमुख यांची गट नं.३५ मध्ये दोन एकर शेती असून त्यांची दोन मुले त्या जमिनीस वारस आहेत. विजेंद्र हा घरातील कर्ता होता.

शेतात कपाशी व आरबी पिकांची लागवड केली होती. यंदा परिसरात अतिवृष्टी झाल्याने शेतातील सर्व पीक वाया गेले. त्यातच कर्जमाफीचा लाभ, अतिवृष्टीचे अनुदानही मिळाले नाही. वाढलेल्या खर्चाने जेरीस आलेल्या विजेंद्रने शनिवारी सकाळी शेतात गुराढोरांना चारापाणी करण्यासाठी जातो असे सांगून शेतात गेला आणि कीटकनाशक प्राशन करून जीवन संपविले. काही वेळानंतर बाजूला असलेले शेतकरी प्रवीण जैन शेतात गेले असता विजेंद्रने विष प्राशन केलेले आढळले.

त्यांनी तत्काळ घरच्या मंडळींना सोबत घेऊन बनोटी येथील खासगी दवाखान्यात उपचारासाठी घेऊन गेले असता डॉक्टरांनी तपासून मृत झाल्याचे घोषित केले. बनोटी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी कृष्णा घावटे यांनी उत्तरीय तपासणी केली. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक श्रीधर गीते, सुभाष पवार, विकास दुबिले, दिलीप कडवी, श्रीकांत पाटील आदी करीत आहेत.
 

संपादन - गणेश पिटेकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL Trade Rumours : हार्दिक पांड्या LSG चा कर्णधार बनणार? MI त्याच्या बदल्यात स्फोटक फलंदाजाची मागणी करणार; सर्व गेम फिरणार...

MSRTC : वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! एसटीच्या जादा बसफेऱ्यांचे नियोजन; पाहा वेळापत्रक

Breathless at High Altitude: डोंगराळ भागात फिरताना दम लागतोय ? या चुका पडतील महाग ! वेळीच करा हे सोपे उपाय...

Junnar Court: मुलीला मिठी मारून विनयभंग करणाऱ्यास तीन वर्षे कारावास; जुन्नर अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल

Tea Dispute: भारताचा नेपाळला मोठा दणका! सीमेवर १३ लाख किलो चहा खोळंबला; नव्या नियमांमुळे व्यापारावर परिणाम

SCROLL FOR NEXT