योगेश जाधव 
छत्रपती संभाजीनगर

सिल्लोड तालुक्यात विजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू

सचिन चोबे

सिल्लोड (जि.औरंगाबाद) : बोरगाव कासारी (ता.सिल्लोड) (Sillod) येथे शनिवारी (ता.२८) विजेच्या धक्क्याने (Electric Shock) एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. या प्रकरणी वडोद बाजार (ता.फुलंब्री) पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. योगेश दादाराव जाधव (वय १९ रा. बोरगाव कासारी (ता.सिल्लोड) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. येथील गट क्रमांक १७८ मधील शेतात पिकांना पाणी देण्यासाठी तो गेला होता. विद्युत पंप सुरू करण्यासाठी गेला (Aurangabad) असता विजेचा धक्का बसला. यातच त्याचा जागीच मृत्यू झाला. परिसरातून जात असलेल्या एका शेतकऱ्यास (Farmer) विहिरीजवळ योगेश मृत अवस्थेत आढळला.

त्याने ही माहिती तातडीने गावामध्ये दिली. ग्रामस्थांनी योगेशला सिल्लोड उपजिल्हा रुग्णालयात नेले. येथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास मृत घोषित केले. शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. दुपारी चार वाजेच्या सुमारास तरुणावर अंत्यसंस्कार करण्यात आले. तरुण सदर तरुण अविवाहित असून त्याच्या पश्चात आई, वडील, एक भाऊ, एक बहीण असा परिवार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs PAK : शफाली वर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड! पाकिस्तानला पहिल्याच चेंडूवर जागा दाखवली; जगात भारी कामगिरी केली Video Viral

DCM Sunetra Pawar : हजार शाळा ‘मॉडेल स्कूल’बनविणार; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

India China Strategy: चीनच्या तुलनेत भारताची तंत्रज्ञान क्षमता वाढविण्याची गरज; ‘चायना कॉन्फरन्स २०२६’मध्ये तज्ज्ञांचा सूर

Sangramdurg Ground Fort : ‘संग्रामदुर्ग’चा दोनशे वर्षांपूर्वीचा नकाशा पुरातत्त्व विभागाकडे मिळाला

Narendra Modi: मोदींचा राहुल गांधींवर हल्ला! म्हणाले, त्यांचा एकच पेटंट डायलॉग असतो.. 'याची काय गरज होती?'

SCROLL FOR NEXT