Aurangabad Accident News esakal
छत्रपती संभाजीनगर

ट्रकचालकाने लावला ब्रेक...अन् दुचाकी ट्रकला धडकल्याने तरुणाचा गेला जीव

डिझेल संपत आल्याने ट्रक चालकाने ट्रक बाजुला घेण्यासाठी अचानक ब्रेक लावला. आणि...

शेख मुनाफ

आडुळ (जि.औरंगाबाद) : समोर धावत असलेल्या ट्रकचे डिझेल संपत आल्याने ट्रक चालकाने ट्रक बाजुला घेण्यासाठी अचानक ब्रेक लावला. त्यामुळे पाठीमागे चालत असलेली दुचाकी ट्रकला धडकल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना औरंगाबाद-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर जुन्या बीड (Beed) बाह्यवळण रस्त्यावरील गांधेली फाट्याजवळ बुधवारी (ता.२७) घडली. श्रीनिवास जाधव असे मृताचे नाव आहे. श्रीनिवास श्रीपती जाधव हे आपल्या दुचाकीने (एमएच-२६ एस ७२५६) दुपारी झाल्टा फाट्याकडुन औरंगाबादकडे ( Aurangabad) जात होते. दुचाकी गांधेली फाट्याजवळ येताच त्यांच्या दुचाकीसमोर धावत असलेल्या मालवाहु ट्रकचे (एमएच २० ईजी ३४२५) डिझेल संपत आल्याने ट्रक चालकाने ट्रक बाजुला घेण्यासाठी ब्रेक मारला. (Youth Died In Truck Accident In Aurangabad)

त्यामुळे ट्रकच्या पाठीमागे असलेली दुचाकी ट्रकला धडकली. यात दुचाकीस्वार श्रीनिवास जाधव (वय २८,रा. नांदेड) हे जागीच ठार झाले. घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस उपनिरीक्षक अलमगीर शेख, सदानंद सिद्ध, अरुण राघूडे, प्रमोद गरड यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य केले व वाहतूक सुरळीत केली. या अपघाताची नोंद चिकलठाणा पोलीस ठाण्यात घेण्यात आली असून पुढील तपास चिकलठाणा पोलीस करीत आहेत.

हेल्मेटच्या विश्वासहर्तेवर प्रश्नचिन्ह

शासनाने प्रत्येक दुचाकीस्वारास हेेल्मेट घालणे सक्तीचे केले आहे. कारण त्यामुळे डोक्याला गंभीर इजा होत नाही. मात्र आजच्या घटनेत सदरील मृत दुचाकीस्वाराने हेल्मेट घातलेले असतांना देखील त्याच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्याला आपला जीव गमवावा लागला. त्यामुळे बाजारपेठेत विक्रीसाठी असलेल्या हेल्मेटची विश्वासहर्ता तपासावी अशी मागणी आता दुचाकीधारकातुन होत आहे.

अपघाताची मालिका सुरुच

मागच्याच आठवड्यात या ठिकाणा जवळच क्रेनच्या धडकेत काद्राबाद येथील दुचाकीस्वार दोन सख्ख्या भावांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे बीड बाह्यवळण रस्त्यावर परत अपघाताची मालिका सुरू झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs ZIMW 3rd T20I: भारताचा दणदणीत विजय; हरमनप्रीत, शफाली वर्माची फटकेबाजी; झिम्बाब्वेविरुद्धची मालिका ३-० ने खिशात

शनि मार्गी होताच ३ राशींचं नशीब पालटणार! रखडलेली कामं पूर्ण होणार, धनलाभाचे योग

Dasara Melava 2026: संजय राऊतांचा अमित शाहांवर हल्लाबोल; 'लॉरेन्स बिश्नोई अस्तित्वात नाही, अमित शाह हेच लॉरेन्स बिश्नोई'

Eknath Shinde : "शेतकऱ्यांच्या लेकींच्या लग्नाचा सर्व खर्च आमचा"; दसरा मेळाव्यातून एकनाथ शिंदेंची सर्वात मोठी घोषणा!

INDW vs ZIMW 3rd T20I: १० चौकार, ५ षटकार अन् ९१ धावा! हरमनप्रीत कौर रडली, चेहरा लपवताना दिसली; म्हणाली, त्या शब्दांनी...

SCROLL FOR NEXT