3corona_1180
3corona_1180 
छत्रपती संभाजीनगर

कोरोनाबाधितांमध्ये तरुणांची संख्या १४ हजार, औरंगाबाद शहरात २२ हजार रुग्ण बरे होऊन घरी परतले

माधव इतबारे

औरंगाबाद : कोरोनाचा धोका वृद्धांना जास्त असल्याने ते काळजी घेत असले तरी कामासाठी घराबाहेर पडणारे तरुण बाधित होत आहेत. महापालिकेकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार आतापर्यंत १८ ते ५० वयोगटातील १४ हजार १७५ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. शहरात कोरोना संसर्ग सुरूच आहे. कामाशिवाय घराबाहेर पडू नका, मास्क, सॅनिटाईझरचा वापर करा, सुरक्षित अंतराचा नियम पाळा अशा सूचना प्रशासनामार्फत केल्या जात आहेत.

मात्र अनलॉकनंतर शहरात रस्त्यावर फिरणाऱ्यांची गर्दी पाहता कोरोना आहे की नाही? अशाच प्रश्‍न प्रत्येकाला पडत आहे. रस्त्यावरील गर्दी वाढली असली तरी रुग्णांचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत आहे. त्यामुळे नागरिकांना काहींसा दिलासा मिळाला आहे. असे असले तरी बाधित रुग्णांमध्ये तरुणांचे प्रमाण वाढत आहे. एकूण बाधित रुग्णांचा आकडा पाहिला तर त्यात सर्वाधिक १४ हजार १७५ तरुणच आहेत. ५० वर्षांवरील सहा हजार ८८९ व्यक्तींना कोरोनाची लागण झाली. पाच ते १८ वयोगटातील तीन हजार १६४ कोरोना बाधित आढळून आले. शून्य ते पाच वर्ष वयोगटातील ५१९ बालकांनाही कोरोनाची लागण झालेली आहे.

दीड हजार जणांवर उपचार सुरू
कोरोनाबाधितांचे आकडे कमी होत आहेत. त्याच प्रमाणात चाचण्या देखील कमी होताना दिसत आहेत. कोरोनाची लागण झालेल्या २४ हजार ७४७ जणांपैकी २२ हजार ४५५ व्यक्ती ठणठणीत होऊन घरी परतले आहेत तर आतापर्यंत ७४१ व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. विविध कोविड केअर सेंटर व रुग्णालयांमध्ये १५५१ जणांवर उपचार सुरू असल्याचे १९ ऑक्टोबरच्या महापालिकेच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

संपादन - गणेश पिटेकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ईशान्य भारतीय चिनी, तर दक्षिणेतील लोक आफ्रिकन लोकांप्रमाणे दिसतात; सॅम पित्रोदांच्या वक्तव्याने वादाची शक्यता

Lok Sabha Poll : शिवसेनेकडून सात नवे चेहरे रिंगणात; एकनाथ शिंदे यांची रणनीती; चार खासदारांचे तिकीट कापले

Ranveer Singh : रणवीरने सोशल मीडियावरून हटवले त्याच्या लग्नाचे फोटो ; चाहत्यांना बसला धक्का

Latest Marathi News Live Update : 'तीन टप्प्यांनंतर हे स्पष्ट झालंय की भाजपचा विजय रथ जनता पुढे नेतेय..' - पंतप्रधान मोदी

Lok Sabha Poll 2024 : जाळलेल्या ईव्हीएममधील ४१० मते सुरक्षित; जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद

SCROLL FOR NEXT