Shiv Sena And Aurangabad Political News esakal
छत्रपती संभाजीनगर

औरंगाबादमध्ये सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा, दोन गटांमध्ये हाणामारी

मेळाव्यानंतर शिवसेनेचा अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर आला आहे.

सकाळ डिजिटल टीम

औरंगाबाद : औरंगाबादमध्ये (Aurangabad) आज मंगळवारी (ता.२९) युवा सेनेचा निश्चय मेळावा पार पडला. मेळाव्यानंतर शिवसेनेचा अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. पक्षाचे दोन गट समोरासमोर आल्याने मारामारीची घटना घडली. अनेक कार्यकर्ते एकमेकांच्या विरोधात भिडले. त्यामुळे वातावरण तापल्याचे पाहायला मिळाले. काही वेळेनंतर हा वाद मिटला. प्रारंभी दोन गट समोरासमोर आले. त्यानंतर गोंधळ सुरु झाला. दोन्ही गट भिडले आणि हाणामारी झाली. युवा सेनेचे सचिव वरुण सरदेसाई (Varun Sardesai) निघून गेल्यानंतर हा राडा घडला. (Yuva Sena Officer Bearers Two Groups Beaten Each Other In Aurangabad)

या घटनेबाबत त्यांनी प्रतिक्रिया दिलेली नाही. यापूर्वीही सरदेसाईंच्या कार्यक्रमात राडा झाल्याच्या घटना घडलेल्या आहेत. सदरील पदाधिकारी युवा सेनेचे नव्हते. मुख्य पदाधिकारी शांत होते. मारामारीची घटना घडली आहे, अशी पुष्टी शिवसेनेच्या स्थानिक नेत्याने प्रसारमाध्यमाशी बोलताना दिली.

वरिष्ठ नेते कारवाई करतील. दुसऱ्या व्यक्तीने येऊन गोंधळ घातला का ? वाद कशामुळे झाला? याचा शोध घेतला जाईल, असे या नेत्याने सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: नऊ वर्षांच्या कालखंडानंतर पुन्हा नगरपरिषद निवडणूक होणार

Tiruchi N. Siva: उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक नाही होणार बिनविरोध?, ‘I.N.D.I.A’ आघाडीकडून तिरुची शिवा उमेदवारीसाठी चर्चेत!

“वयाचं गणित फेल!” – सुबोध-रिंकूच्या जोडीनं सोशल मीडियावर रंगली ट्रोलिंग, रिंकू- सुबोधच्या वयात नक्की किती अंतर आहे?

Latest Marathi News Live Updates : निम्न दूधनाचा पाणीसाठा ७० टक्क्यांवर

Mumbai Rain: मुंबईत पावसाचा कहर! वांद्र्यात मुलगा बुडाला, शोध घेण्याचे प्रयत्न सुरू, परिसरात भीतीचं वातावरण

SCROLL FOR NEXT