Chhatrapati Sambhaji Nagar sakal
छत्रपती संभाजीनगर

Diwali Holidays : विद्यार्थ्यांना दिवाळीत मिळणार २० दिवस सुटी

नवीन शैक्षणिक वर्षात ७६ दिवस सुट्या; २३८ दिवस शालेय कामकाज

सकाळ वृत्तसेवा

Chhatrapati Sambhaji Nagar News - राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाच्या पत्रकानुसार २०२३-२४ या शैक्षणिक वर्षातील सर्व प्रकारच्या एकूण सुट्या ७६ दिवसांपेक्षा जास्त होणार नाहीत, याची दक्षता घेण्याचे आदेश आहेत.

त्यानुसार छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेअंतर्गत सर्व शाळांना दिवाळीची सुटी ९ ते २५ नोव्हेंबरदरम्यान असेल. मात्र, २६ नोव्हेंबरला रविवार आणि २७ नोव्हेंबरला गुरुनानक जयंती असल्याने मुलांना तब्बल वीस दिवस दिवाळी साजरी करता येणार आहे. २८ तारखेपासून शाळा सुरू होतील.

दरवर्षी शिक्षण विभागाकडून नवीन शैक्षणिक वर्षाच्या सुट्याचे वेळापत्रक जाहीर होते. यंदाही जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी वेळापत्रक जाहीर केले आहे.

यात प्रथम सत्र १५ जूनपासून सुरू झाले असून ते ८ नोव्हेंबरपर्यंत असणार आहे. त्यानंतर ९ ते २५ नोव्हेंबरदरम्यान दिवाळीची सुटी दिली जाईल. २६ नोव्हेंबरला रविवार, २७ तारखेला गुरुनानक जयंती आहे. त्यामुळे द्वितीय सत्र २८ नोव्हेंबर २०२३ ते १ मे २०२४ पर्यंत असेल. २ मे ते १४ जून २०२४ अशी ३७ दिवस उन्हाळी सुटी असेल.

शाळांना दिवाळीची दीर्घ सुटी कमी करून त्याऐवजी गणेशोत्सव अथवा नाताळ यासारख्या सणांना सुट्या देण्यासंदर्भातील निर्णय शालेय व्यवस्थापन समितीच्या मान्यतेने घेता येणार आहे. तसेच मुख्याध्यापकांच्या अधिकारातील दोन सुट्या स्थानिक मागणीप्रमाणे, शालेय व्यवस्थापन समितीच्या मान्यतेने जाहीर कराव्यात असे शिक्षणाधिकारी एम. के. देशमुख (माध्यमिक), जयश्री चव्हाण (प्राथमिक) यांनी सूचित केले आहे.

शाळेचे कामकाज किमान २३८ दिवस

यंदाच्या शैक्षणिक वर्षात ७६ दिवसांपेक्षा जास्त सुट्या होणार नाहीत याची दक्षता जिल्हा परिषद शिक्षण विभागाला घ्यावी लागणार आहे. शाळांचे कामकाज किमान २३८ दिवस असले पाहिजे. यासह जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यासाठी निश्चित केलेल्या स्थानिक सुट्या व शासनाकडून जाहीर करण्यात आलेल्या सुट्या शाळांना देणे बंधनकारक आहे.

चार सार्वजनिक सुट्या रविवारीच

यंदाच्या शैक्षणिक वर्षात चार सार्वजनिक सुट्या रविवारी आल्या आहेत. यामध्ये १५ ऑक्टोबरला घटस्थापना, १२ नोव्हेंबर लक्ष्मीपूजन, नरक चतुर्दशी, १४ एप्रिलला डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, २१ एप्रिलला महावीर जयंतीचा समावेश आहे. त्यामुळे शाळेच्या सार्वजनिक सुट्या कमी झाल्या आहेत(Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT