file photo 
मराठवाडा

Video: ऑटोचालकांना पोलिसांकडून गुलाबपुष्प

गणेश पांडे

परभणी : परभणी शहरात गाडी चालविण्याची क्षमता ज्यांच्यात असते ते जगाच्या पाठीवर कुठेही गाडी चालवू शकतात असे नेहमी उपरोधात्मक बोलले जाते. या शहरातील काही ऑटोचालकांना शिस्त नसल्याने शहरात कुठेही, केव्हाही व कितीही वेगाने त्यांच्या रिक्षा पळत असतात. या ऑटोचालकावर कारवाई केली जाते. परंतू, शिस्तीत ऑटो चालवून पोलिसांना सहकार्य करणाऱ्या ऑटोचालकांचा परभणी शहराचे सहायक पोलिस अधिक्षक नितीन बगाटे यांनी शनिवारी (ता.चार) गुलाब पुष्प देऊन सत्कार केला. गांधीगिरीचा मार्ग अवलंबिला आहे.

परभणी शहरात ऑटोरिक्षाचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतो. कारण या शहरातील बेरोजगारी इतकी वाढली आहे की, पदवीधर किंवा त्यापेक्षाही जास्त शिक्षण घेतलेले अनेक बेरोजगार तरूण या व्यवसायात येत आहेत. त्यामुळे शहरात ऑटो रिक्षाची दिवसे -दिवस वाढ होतांना दिसते. याचा परिणाम शहराच्या वाहतुक व्यवस्थेवर होतांना दिसत आहे. ज्यांना ऑटोरिक्षा चालविण्याचे नियम माहिती नाहीत, किंवा नव्यानेच रोजी रोटीसाठी व्यवसाय करणाऱ्या चालकांमुळे शहरातील वाहतुकीची शिस्त बिघडत चालली आहे. शहरातील ऑटोरिक्षा चालकांवर वाहतुक शाळेच्यावतीने अनेक वेळा कारवाई करण्यात आली. परंतू, नव्याचे नऊ दिवस शिस्त अंगी बाळगून पुन्हा पहिले पाढे पंच्चावण होतांना दिसतात. 


दिवसेदिवस वाढते डोकेदुखी 
या मुळे परभणी शहर वाहतुक शाखेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांची दिवसेदिवस डोकेदुखी वाढत जात आहे. ऑटोचालकांवर कारवाई केली जाते. परंतू जे ऑटोचालक नियमांचे पालन करून शिस्तीत ऑटो चालवितात त्यांचा पोलिसांनाकडून गौरव देखील करण्यात येतो. परभणीचे सहायक पोलिस अधीक्षक नितीन बगाटे यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. शनिवारी (ता.चार) दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास शहरातील रेल्वेस्थानक, बसस्थानक व इतर वर्दळीच्या ठिकाणी रस्त्यावर शिस्तीत लावण्यात आलेले ऑटोरिक्षा, नियंत्रीत वेगाने धावणारे ऑटोरिक्षा चालकांना पोलिसांनी चक्क गुलाब पुष्प देऊन त्यांचा सत्कार केला. त्याच बरोबर त्यांना वाहतुकीचे नियम ही थोडक्यात समजावून सांगण्यात आले. 

कुठेतरी सन्मान झाला पाहिजे
शहरातील ऑटोरिक्षा चालकांना शिस्त लागावी. त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला जाऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करतो. परंतू, जे ऑटोरिक्षा चालक, टॅक्सीचालक नियमांचे पालन करून जबाबदारीने वाहतुक करतात त्यांचा कुठेतरी सन्मान झाला पाहिजे यासाठी त्यांचा आम्ही आज गुलाब पुष्प देऊन सत्कार केला.
- नितीन बगाटे, सहायक पोलिस अधिक्षक, परभणी शहर

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT