Davandi1 
मराठवाडा

दवंडीच्या माध्यमातून गावांमध्ये ‘कोरोना’ची जनजागृती

सकाळ वृत्तसेवा

औंढा नागनाथ ः ‘कोरोना’ नावाच्या जीवघेण्या आजाराचा उद्रेक भारतात व राज्याच्या शहरी भागात झाला असून या कोरोना रोगाचा प्रदुर्भाव रोखण्यासाठी औंढा तालुका आरोग्य विभागातर्फे पाच प्राथमिक आरोग्य केंद्र व ८० आरोग्य कर्मचारी व मोबाईल ॲप सज्ज असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश गायकवाड यांनी सांगितले. तालुका आरोग्य अधिकारी यांच्या आवाहनाबरोबर ग्रामीण भागामध्ये ग्रामपंचायत व पोलिस पाटील, सामाजिक कार्यकर्त्यांच्या पुढाकारातून दुर्मिळ झालेल्या दवंडीच्या स्वरूपात कोरोना या आजाराला शह देण्यासाठी सतर्क राहून आरोग्याची काळजी घेण्याचा वारंवार इशारा देण्यात येत आहे. 

‘कोरोना’ या आजाराचे संकट देशावर आले असून या संसर्ग आजारावर मात करण्यासाठी ग्रामीण भागातील नागरिकांनी आरोग्य कर्मचाऱ्यांचा सल्ला घेऊन स्वतःच्या परिवाराचे व देशाचे संरक्षण करण्यासाठी आरोग्य विभागाला सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले आहे. तालुक्यातील सर्व आरोग्य अधिकारी, कर्मचारी, आशा वर्कर यांची बैठक घेऊन सर्वांना कोरोना आजार याविषयी प्रशिक्षण उपायोजना याबद्दल माहिती देण्यात आली. यामध्ये प्रत्येक गावातील लोकापर्यंत कोरोना या संसर्गजन्य आजाराची माहिती व उपाय स्वतः नागरिकांनी घ्यावयाची काळजी याबद्दल प्रसिद्धीपत्रक, पोस्टर बॅनर, भितीपत्रके इत्यादी मोठ्या प्रमाणात वाटप करून प्रचार करण्यात आला.

आरोग्य शिक्षणाचे काम सुरू

औंढा तालुक्यातील चार आरोग्य प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये व साथ नियंत्रण पथक तयार करून चार प्राथमिक आरोग्य केंद्रांमधून आरोग्य कर्मचारी व प्रत्येक गावात आरोग्य सेवक व आशावर्कर ग्रामसेवक मार्फत आरोग्य शिक्षणाचे काम सुरू असून दैनंदिन आढावा घेतला जात आहे. राज्यांमध्ये साथरोग कायदा लागू झालेला आहे तरी आपण सर्वजण या राज्यावरील आलेल्या परिस्थितीवर मात करून आपले व आपल्या देशवासीयांचे कोरोना (कोविड १९) या आजारापासून संरक्षण करण्याचे आवाहन स्वीकारून आलेल्या परिस्थितीवर एकजुटीने व धैर्याने मात करावी. अफवा पसरू नका व अफवांवर विश्वास ठेवू नका.

आरोग्य शिक्षणावर भर देण्याचे आवाहन
ग्रामीण भागातील लोक संभ्रमात असतात, त्यांच्या शंकेचे व्यवस्थित निराकरण करा व आरोग्य शिक्षणावर भर देण्याचे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश गायकवाड यांनी केले आहे. तालुका आरोग्य अधिकारी यांच्या आवाहनाबरोबर ग्रामीण भागामध्ये ग्रामपंचायत व पोलिस पाटील, सामाजिक कार्यकर्त्यांच्या पुढाकारातून दुर्मिळ झालेल्या दवंडीच्या स्वरूपात कोरोना या आजाराला शह देण्यासाठी सतर्क राहून आरोग्याची काळजी घेण्याचा वारंवार इशारा देण्यात येत आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: सामाजिक कार्यकर्त्यावर जीवघेणा हल्ला, धारदार शास्त्राने वार करत...; शिवसेना आमदारावर हल्ल्याचा आरोप

Abhijeet Dipke: मोठी बातमी! ३ सेकंदात ४ थप्पड... कॉकरोच जनता पक्षाचे संस्थापक अभिजीत दीपकेंवर हल्ला; जमावाकडून तरुणाला मारहाण, काय घडलं?

Pune Crime: शेअर रिक्षातील गर्दीचा फायदा घेत ज्येष्ठ महिलेची एक लाखांची सोनसाखळी लंपास

Pune Fraud: वाघोलीत बनावट जिल्हाधिकारी व तहसीलदार आदेश प्रकरण उघड: शेतजमीन नोंदणीसाठी शासनाची फसवणूक

Pune Crime : येरवड्यात आरडाओरड्याचा जाब विचारल्याने तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला, आरोपी शोएब कुरेशी अटकेत

SCROLL FOR NEXT