नांदेड : फुले- शाहू- आंबेडकरी विचारधारा समाजमनात रुजविण्यासाठी गेल्या अनेक वर्षापासून कार्यरत असलेल्या बामसेफ या आंबेडकरी अधिकारी व कर्मचारी संघटनेच्या वतीने येथे ता. २८ आणि ता. २९ डिसेंबर रोजी बामसेफ राष्ट्रीय क्षेत्रीय संकल्प अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. सौभद्र मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाचे उद्घाटन महानगरपालिकेचे आयुक्त लहुराज माळी यांच्या हस्ते करण्यात येणार असून यावेळी विशेष अतिथी म्हणून वंचित बहुजन आघाडीचेप्रमुख ॲड. प्रकाश आंबेडकर उपस्थित राहणार आहेत. दोन दिवस चालणाऱ्या या अधिवेशनात विविध विषयावर व्याख्याने आयोजित करण्यात आल्याची माहिती बामसेफ राष्ट्रीय क्षेत्रीय संकल्प अधिवेशनाच्या संयोजन समितीने गुरूवारी (ता. २६) पत्रकार परिषदेत दिली.
देशात आजची परिस्थितीही सामाजिक, राजकीय आणि धार्मिक दृष्ट्या अत्यंत अस्वस्थ आहे. समता, स्वातंत्र्य, बंधुता व न्याय या भारतीय संविधानच्या मूल्यांना पायदळी तुडवले जात आहे. या पार्श्वभूमीवर विचार मंथन घडवून आणण्यासाठी ता. २८ आणि ता. २९ डिसेंबर रोजी हे अधिवेशन आहे. सकाळी अकरा वाजता या अधिवेशनाचे उद्घाटन आयुक्त लहूराज माळी यांच्या हस्ते होणार. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी बामसेफचे राष्ट्रीय अध्यक्ष पंचशील कुंभारे उपस्थित राहणार आहेत. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ॲड. प्रकाश आंबेडकर हे यावेळी मार्गदर्शन करणार असून यावेळी विजेंदरसिंग, पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर, मुख्य वक्ता बेचरभाई राठोड, अशोक कुमार डोंगरे यांची उपस्थिती राहणार आहे.
संत व विचारवंताचे मार्गदर्शन
दुसऱ्या सत्रातील व्याख्यानात इन्कलाब मिर्झा, संत बाबा बलविंदरसिंग, भंते पैय्या बोधी, फादर डिकोस्टा , मौलाना आयुब हाश्मी,स्वामी दिगंबर शिवाचार्य हे उपस्थित राहणार आहेत. दुसऱ्या सत्रात प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मिडीया देश आणि बहुजनाला गुमराह करत आहे काय या विषयावर करतारसिंह कोचर अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष यांचे मार्गदर्शन होणार. यावेळी ॲड. आर. एल. जांगड, डॉ. विष्णू जाधव, डॉ. धनराज वंजारी, ॲड. ऋतुजा पलसपगार, ॲड. शाम तांगडे, मोहनभाई परमार हे मार्गदर्शन करणार आहेत.
येथे क्लीक करा --चोरट्याकडून दोन दुचाकी व ११ मोबाईल जप्त
तिसऱ्या सत्रात संविधानाबद्दल माहिती
अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी ता. २९ डिसेंबर रोजी फुले- आंबेडकरी मिशनरी संघटनद्वारा प्रबुद्ध भारताचे निर्माण संभव आहे का ? या विषयावर ओम करमाळकर, डी. टी. कांबळे, विजय मेहता , डॉ. जे.जे. मानकर हे विचार मांडणार आहेत.
त्यानंतर दुपारी एनआरसी व एसीसी संशोधन बिल या विषयावर पंचशील कुंभारे यांच्या अध्यक्षतेखाली सिद्धार्थ परमार, मोहन राठोड, ॲड. शाफियोदिन अहमद, मार्टिन मेकवन, प्रा. आनंद देगावकर, ॲड. रावसाहेब मोहन हे विचारमंथन करणार आहेत. तर शेवटच्या सत्रात संविधानातील कलम ३७०, ३५ ए आणि आरक्षण समीक्षा व सामाजिक संघटन विषयी एम आर उपलवर, सुरेश गायकवाड, शिवाजीराव ढवळे,विलास सूर्यवंशी व्याख्यान देणार आहेत. या सर्व कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन बामसेफचे नांदेड जिल्हा कार्यकारणी आणि संयोजन समितीने केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.