bamu bamu
मराठवाडा

विद्यापीठाच्या इतिहासात प्रथमच दीक्षांत समारंभ ऑनलाइन

सकाळी १०:३० ते १२:३० या वेळेत सदर कार्यक्रम होईल. यावेळी संशोधकांच्या पीएच.डी. चे वितरण प्रत्यक्ष न घेता ऑनलाइन पद्धतीने नाव वाचन होईल

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद: डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या (Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University) इतिहासात पहिल्यांदाच दीक्षांत समारंभ (convocation ceremony) ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येणार आहे. कुलपती तथा राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (ता.२५) ऑनलाइन पद्धतीने दीक्षांत समारंभ होईल. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेचे अध्यक्ष, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ.अनिल सहस्रबुद्धे हे यंदाचे दीक्षांत समारंभाचे प्रमुख पाहुणे आहेत. उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत, कुलगुरू डॉ.प्रमोद येवले यांच्यासह सर्व अधिष्ठाता़, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत.

सकाळी १०:३० ते १२:३० या वेळेत सदर कार्यक्रम होईल. यावेळी संशोधकांच्या पीएच.डी. चे वितरण प्रत्यक्ष न घेता ऑनलाइन पद्धतीने नाव वाचन होईल. या समारंभात ४२२ संशोधकांना पीएचडी प्रदान करण्यात येईल. यामध्ये कला व सामाजिकशास्त्रे -१७४, विज्ञान व तंत्रज्ञान -१२७, वाणिज्य व व्यवस्थापनशास्त्र - ५८ तसेच आंतरविद्या शाखेच्या -६३ संशोधकांचा समावेश आहे.

राजभवनाच्या प्रोटोकॉलनुसार सदर सोहळा अत्यंत शिस्तबद्ध व प्रोफेशन पद्धतीने होणार आहे.
सोहळ्याच्या नियोजनासाठी विविध १४ समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. या कार्यक्रमात एकूण ८१ हजार ७३६ पदवीधारकांना पदवी प्रदान करण्यात येईल. विज्ञान व तंत्रज्ञान - ३८ हजार ५४१, मानव्यविद्या - २० हजार ३९२, वाणिज्य शास्त्र - १७ हजार ५९३, आंतरविद्या शाखेच्या ४ हजार २१० जणांचा समावेश आहे, अशी माहिती कुलगुरू डॉ.प्रमोद येवले यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Auction Live : राजस्थानमधील १९ वर्षीय पोराच्या डोक्यावर CSK ने ठेवला हात! मोजले तब्बल १४ कोटी; Who is Kartik Sharma?

द फॅमिली मॅन फेम अभिनेत्याची ड्रग तस्करी प्रकरणात तुरुंगात रवानगी; फिल्म इंडस्ट्रीतील ओळखीचा करत होता गैरवापर

Paithan News : केकत जळगावमध्ये ग्रामस्थांची सतर्कता कामी आली; महावितरण तार चोरीचा प्रयत्न फसला!

Jalgaon News : थंडीचा कडाका अन् मेथीच्या लाडूंचा तडका! जळगावात घराघरांत दरवळला पारंपरिक स्वाद

IPL 2026 Auction: CSK ने प्रशांत वीरवर १४ कोटी का लावले? २० वर्षीय खेळाडूकडे असं काय आहे खास? वाचाल तर खूश व्हाल

SCROLL FOR NEXT