Bank
Bank 
मराठवाडा

बॅंक खाते घेतले भाड्याने!

मनोज साखरे

औरंगाबाद - बेरोजगारांची स्वप्ने धुळीस मिळवून गंडविल्यानंतर त्यांच्याकडून ऑनलाइन येणारी रक्‍कम ठेवण्यासाठी सचिन सिंह या भामट्याने सात जणांचे चक्क बॅंक खातेच भाड्याने घेतल्याची खळबळजनक माहिती समोर आली.

महिन्याकाठी सहा ते सात हजार रुपये तो खातेधारकांना द्यायचा. या बदल्यात खातेधारकाचे एटीएम कार्ड स्वत:च्या ताब्यात ठेवून फसवणुकीची माया गोळा करीत होता, असे सूत्रांनी सांगितले. 

सचिन कैलाशनाथ सिंह मूळ उत्तरप्रदेशातील रहिवासी असून तो व त्याच्या पत्नीचे पदवीपर्यंत शिक्षण झाले. वर्ष २००६ पासून तो कॉल सेंटरमध्ये काम करीत होता. यानंतर त्याने बॅंकेत तसेच मार्केर्टिंग क्षेत्रात नोकरी केली. त्यामुळे त्याच्याकडे बोलण्याचे कसब व इतरांना विश्‍वासात घेण्याची शैली होती. याचाच वापर करून तो वर्ष २०१६ ला कुमार्गाकडे वळला. विमान प्राधिकरणात नोकरी देण्याच्या आमिषाने त्याने अनेकांना गंडविण्यास सुरवात केली. काही महिन्यांतच तो लखपती झाला. वसईत ब्रोकरशिपच्या नावाखाली फसवणुकीचा धंदा त्याने जोमाने सुरू केला. त्यातून अनेकजण त्याच्या खात्यात पैसे जमा करीत होते. बॅंक खाते संशयाच्या भोवऱ्यात येऊ नये म्हणून त्याने बेरोजगार व गरजवंतांना आमिष दाखवून त्यांचे राष्ट्रीयीकृत बॅंकेतील खाते वापरण्यास सुरवात केली. एका बॅंक खातेदाराला सहा ते सात हजार रुपये तो महिन्याकाठी देत होता. खातेदाराचे एटीएम तो स्वत: वापरीत असल्याची बाब सूत्रांनी सांगितली.

ओएलएक्‍सची कहाणी
सचिन सिंह याने नोकरी मिळवा, अशी जाहिरात ओएलएक्‍सवर टाकली होती. ही जाहिरात पाहून तौफिक पटेलने पार्टटाइम जॉबसाठी त्याच्याशी संपर्क केला. त्यावेळी जॉब का छोड, मेरे साथ काम कर, अच्छा खर्चा-पाणी दूंगा, असे त्याने सांगितल्याने तौफिक सचिनसोबत काम करू लागला. त्याचे खातेही सचिनने वापरले आहे.

खात्यात छदामही नाही
फसवणुकीशी संबंधित तौफिक व अन्य सहा ते सात खातेदारांच्या बॅंक खात्याची पोलिसांनी चाचपणी केली. त्यावेळी एकाही खात्यात छदाम नव्हता. परंतु, या सर्व खात्यांत सुमारे सतरा ते अठरा लाखांचा व्यवहार झाला असून हा पैसा कुठे आहे, हे गूढ अद्याप उकलले नाही.

नोकरीच्या शोधातील बेरोजगारांनी नोकरीकरिता कोणताही आर्थिक व्यवहार करताना दक्षता बाळगावी. नोकरीसाठी पैसे मागणाऱ्यांचा संशय आल्यास औरंगाबाद ग्रामीण पोलिसांना कळवावे. 
- आरती सिंह, पोलिस अधीक्षक, औरंगाबाद ग्रामीण.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Weather Updates: मे महिन्यातही सूर्य आग ओकणार! पावसासंदर्भातही मोठी अपडेट; IMD ने काय सांगितलं?

Shyam Rangeela: मेरे प्यारे देशवासियो... मोदींची मिमिक्री करत प्रसिद्ध झालेल्या कॉमेडियनचे वाराणसीतून पंतप्रधानांना आव्हान

Prajwal Revanna : 'प्रज्वल' प्रकरणामुळे प्रचाराची दिशाच बदलली; काँग्रेस आक्रमक, JDS ऐवजी भाजप नेते रडारवर

Parveen Shaikh: इस्रायल-हमास युद्धावर पोस्ट केल्याने प्रिन्सिपलवर नोकरी गमावण्याची वेळ

Latest Marathi News Live Update : १५ जूनपर्यंत मालमत्ता कर भरल्यास मिळणार १०% सूट

SCROLL FOR NEXT