Beed Corona Updates  
मराठवाडा

कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ, बीड जिल्ह्यात १८५ रुग्ण आढळले

दत्ता देशमुख

बीड : दोन तीन महिने रुग्णसंख्या आटोक्यात आल्याने लोकही निर्धास्त झाले आणि कोरोना विषाणू संसर्गाच्या उपाय योजनाच बंद केल्या. परिणामी रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. गुरुवारी (ता. ११) तब्बल १८५ रुग्ण आढळले. मागच्या वर्षी मार्च महिन्यात कोरोना विषाणू संसर्ग सुरु झाला. जिल्ह्यात कोरोनाला प्रवेश करायला मे महिना उजाडावा लागला. त्यानंतरही रुग्णसंख्या आटोक्यात होती. मात्र, जुलै - ते सप्टेंबर महिन्यात रुग्णसंख्या झपाट्याने वाढली. अगदी १५ सप्टेंबर २०२० या एकाच दिवशी जिल्ह्यात ४०५ रुग्ण आढळले. तर, याच महिन्यात एकाच दिवशी उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या २७५८ होती. दरम्यान, नंतर कोरोना विषाणूचा संसर्ग काहीसा कमी होत गेला.

फेब्रुवारीच्या सुरुवातीला उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या दोनशेच्या घरात आली. मात्र, रुग्णसंख्या घटल्याने लोकांनी कोरोना संपला असा समज करून घेतला आणि तोंडाचा मास्क आणि सॅनिटायझर बाजूला फेकत पुन्हा गर्दी सुरु केली. त्याचे परिणाम आता दिसत आहेत. मागच्या महिनाअखेर रोज १५ - २० आढळणारे रुग्ण हळूहळू पन्नाशीच्या घरात गेले आणि नंतर तर हा आकडा शंभर व त्यापुढेही जाऊ लागला.

वाढत्या रुग्णसंख्येमुळे उपाय योजनांचा भाग म्हणून प्रशासनाने सुपर स्प्रेडर (व्यापारी - व्यावसायिक) यांची अँटीजेन तपासणी मोहीम हाती घेतली. गुरुवारी नियमित रुग्ण आणि अँटीजेन टेस्ट मोहिमेतील तपासणीत १४०७ लोकांचे अहवाल गुरुवारी प्राप्त झाले. यात १८५ कोरोनाबाधित आढळले. तर १२२२ लोकांचे अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्याची रुग्णसंख्या १९ हजार ८२३ झाली. तर आतापर्यंत १८ हजार ६७९ रुग्ण कोरोनामुक्त झाले. आतापर्यंत ५८८ कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सध्या जिल्ह्यात ५५६ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

संपादन - गणेश पिटेकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

उपमुख्यमंत्री शिंदेंच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड, उड्डाणावेळी...; गुजरात दौऱ्यात काय घडलं?

Nashik Land Scam: 'टंकलेखनातील चूक' सांगत ९८ हजार चौ.मी. जमीन गायब? पीटीसीसमोरील ६२ एकर जमीन प्रकरणात जिल्हा प्रशासनाचा खंडपीठात अहवाल

Latest Marathi News Update : दिशा सालियान प्रकरणी संजय राऊतांचा मोठा दावा, भाजपवर थेट इशारा

Shaktipeeth Highway Protest : शक्तीपीठ महामार्गाविरोधात गणेशोत्सवातील देखाव्यातून विरोध; राजू शेट्टी, सतेज पाटील, जयंत पाटलांना भावनिक साद

Devendra Fadnavis: पिके करपली, दुष्काळाचे संकट गडद; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले एनडीआरएफची वाट पाहणार नाही, आधीच शेतकऱ्यांना मदत देणार

SCROLL FOR NEXT