beed corona beed corona
मराठवाडा

Beed: कोरोना पुन्हा पावणे दोनशे पार; आष्टी, शिरूरमध्ये संख्या वाढतीच

गुरुवारी (ता. २२) ३ हजार ९६६ लोकांचे स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आले. शुक्रवारी हाती आलेल्या तपासणी अहवालात १८३ लोकांना कोरोनाची बाधा असल्याचे निष्पन्न झाले

दत्ता देशमुख

बीड: कोरोना विषाणूची दुसरी लाट जिल्ह्यात ओसरण्याचे नाव घेत नाही. आष्टी आणि शिरुर कासार तालुक्यात रुग्णसंख्या वाढतीच आहे. परिणामी शुक्रवारी (ता. २३) जिल्ह्यात पुन्हा एकदा कोरोना रुग्णसंख्येने पावणे दोनशेंचा (१८३) पल्ला पार केला. विशेष म्हणजे पॉझिटिव्हिटी रेटही वाढला आहे. मागच्या काही दिवसांपासून कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या कमी आणि कोरोना रुग्णांचा आकडा अधिक असल्याने सक्रिय (उपचार घेत असलेले रुग्ण) रुग्णांची संख्या वाढत आहे. तर, दुसरीकडे काळ्या बुरशीमुळे होणाऱ्या म्युकरमायकोसिस या आजाराच्या सक्रिय रुग्णांची संख्या घटली आहे.

गुरुवारी (ता. २२) ३ हजार ९६६ लोकांचे स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आले. शुक्रवारी हाती आलेल्या तपासणी अहवालात १८३ लोकांना कोरोनाची बाधा असल्याचे निष्पन्न झाले. तर, ३७८३ स्वॅब नमुन्यांचे अहवाल निगेटिव्ह आले. तपासणीच्या तुलनेत रुग्ण आढळण्याचे प्रमाण (पॉझिटिव्हिटी रेट) पुन्हा वाढून ४.६१ झाला. दरम्यान, आढळलेल्या रुग्णांत सर्वाधिक ५५ रुग्ण आष्टी तालुक्यातील आहेत. तर, शिरूर कासार तालुक्यातही ३१ रुग्णांचा समावेश आहे. अंबाजोगाईत आठ, बीड २४, धारुर १७, गेवराई ११, केज १२, माजलगाव पाच, परळी दोन, पाटोदा ११ व वडवणी तालुक्यातील सात रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्याची रुग्णसंख्या आता ९५ हजार ७१७ झाली आहे. तर, आतापर्यंत ९१ हजार ३८४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मे महिन्याच्या सुरुवातीला सक्रिय रुग्णसंख्या १५ हजारांच्या घरात होती. अलीकडे हा आकडा नऊशेंच्या घरात होता. पण, आता पुन्हा रोज आढळणारे रुग्ण वाढल्याने सक्रिय रुग्णांची संख्या साडेचौदाशेंच्या पुढे गेली आहे. सध्या बाहेर जिल्ह्यात ५१ तर जिल्ह्यात १४०२ रुग्ण उपचार घेत आहेत. शुक्रवारी आणखी दोन कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूची नोंद झाली. आतापर्यंत जिल्ह्यातील २५८१ कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला आहे.

‘म्युकर’ जैसे थे
म्युकरमायकोसिस या काळ्या बुरशीच्या आजाराच्या रुग्णसंख्येत शुक्रवारी कुठलीही वाढ झाली नाही. आतापर्यंत २०३ म्युकरमायकोसिसचे रुग्ण आढळून आले आहे. यापैकी १३६ रुग्णांना उपचारानंतर सुटी देण्यात आली आहे. सध्या १९ रुग्णांवर स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय तसेच जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. आतापर्यंत ३६ रुग्णांचा म्युकरमायकोसिस या आजाराने मृत्यू झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Squad for WI Series: रोहित शर्माच्या भविष्याचा फैसला झाला... वेस्ट इंडिजविरुद्ध BCCI ची वन डे, ट्वेंटी-२० संघाची घोषणा

Manoj Jarange Patil: मोठी बातमी! हैदराबाद गॅझेटियरमध्ये नावंसुद्धा सापडली; विखे पाटलांसह शिष्टमंडळ हैदराबादला जाणार?

Vidyadhar Anaskar : राज्य सहकारी बँकेचे ५,७४५ कोटींचे विक्रमी नेटवर्थ; ठेवी कमी करण्याचा निर्णय व्यावसायिक गणितातून

Marathi News Live Updates : गणेशोत्सवानिमित्त भाजपाध्यक्ष नितीन नबीन यांची मोहोळ यांच्या निवासस्थानी भेट

पाकिस्तानचं नवीन नाटक! PCB नंतर आता हॉकी संघाने भारतात येण्यास दिला नकार; म्हणतात, आमच्या खेळाडूंना सुरक्षित वातावरण हवंय...

SCROLL FOR NEXT