संग्रहित छायाचित्र 
मराठवाडा

बीड क्राईम - प्रतिकार करणाऱ्या मुलावर चोरट्याकडून चाकूचे सपासप वार 

सकाळ वृत्तसेवा

आष्टी (जि. बीड) - चोरीस प्रतिकार करणाऱ्या मुलावर चोरट्याने चाकूचे वार करीत जखमी करून घरातील एक लाख 22 हजारांचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास केले. तालुक्‍यातील डोईठाण येथील खाडे वस्तीवर शनिवारी (ता. 18) मध्यरात्री हा प्रकार घडला. 

पोलिसांकडून समजलेली माहिती अशी, की तालुक्‍यातील डोईठाण येथील खाडे वस्तीवर राहणाऱ्या द्वारकाबाई विठ्ठल खाडे या पती, दोन मुले व सुनांसह राहतात. शनिवारी रात्री जेवण झाल्यानंतर त्या नवीन घरात सून सोनी, नणंद मखमलबाई आघाव व मुलगा पवन यांच्यासह झोपण्यासाठी आल्या. त्यांचे पती जुन्या घरी थांबले होते. नणंद व सुनेसह त्या एका खोलीत, तर मुलगा पवन हा दुसऱ्या खोलीत झोपला.

मध्यरात्री तीनच्या सुमारास खोलीतील लोखंडी दरवाजाचा आवाज आल्याने त्यांना जाग आली. त्यावेळी कपाटाजवळ एक अनोळखी व्यक्ती तोंडाला हातरुमाल बांधलेल्या अवस्थेत सोन्याचे दागिने असलेले पाकीट खिशात घालून निघाल्याचे दिसले. त्याने द्वारकाबाई यांना चाकूचा धाक दाखवून गप्प बसण्यास सांगितले. तो घराबाहेर गेल्यानंतर त्यांनी आरडाओरड केल्यानंतर शेजारच्या खोलीत झोपलेला मुलगा पवन हा घराबाहेर आला. तेव्हा घराच्या पायऱ्यांजवळ बसलेल्या दोन व्यक्तींनी पळत जाऊन दुचाकी सुरू केली.

पवन याने पळत जाऊन दुचाकीला लाथ मारून त्यांना खाली पाडले. त्यावेळी द्वारकाबाई यादेखील तेथे गेल्या. या दोघांनी चोरट्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. यावेळी पवन व चोरट्यांमध्ये झटापट झाली. यात पवनने दोघा चोरट्यांना मारले व एकाच्या दंडाला चावा घेत दुसऱ्याच्या नाकावर बुक्की मारली. मात्र, यावेळी तिथे आलेल्या तिसऱ्या व्यक्तीने पवनच्या दंड, कपाळ व छातीवर चाकूने सपासप वार करून जखमी केले. यानंतर तिघेही दुचाकीने धामनगावच्या दिशेने पसार झाले.

जखमी पवन यास द्वारकाबाई यांनी पती व सुनांच्या मदतीने उपचारासाठी जीपने नगर येथे पाठविल्यानंतर घरात पाहणी केल्यानंतर कपाटातील सोन्याचे दागिने, बाळाचे जोडे, चांदीसह एकूण एक लाख 22 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरीस गेल्याचे निदर्शनास आले. द्वारकाबाई खाडे यांनी रविवारी (ता. 19) आष्टी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून तीन चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Operation Tiger: ..म्हणून ऑपरेशन टायगर अपयशी? भाजपच्या शब्दावर खासदारांची मदार, दोघांच्या सह्याच नाहीत

BMC jobs: मुंबई महापालिकेकडून मोठी भरती जाहीर! २० ते ३० हजार पगार अन्... राजावाडी रुग्णालयात विविध पदांसाठी संधी, अर्ज कसा करायचा?

Latest Marathi News Live Update: पुण्यातील कचऱ्यासंदर्भात राज्यमंत्र्यांचे आदेश

T20I World Cup, IND vs NED: स्मृती मानधनाचा अर्धशतकासह मोठा विक्रम, शफाली वर्माचीही वादळी फिफ्टी; भारताच्या २०० धावा पार

Nasrapur Crime Case : नसरापूर प्रकरणात सरकार पक्षाने १६ दिवसांत सादर केले पुरावे; ५५ साक्षीदारांची नोंदवली साक्ष

SCROLL FOR NEXT