Ambajogai Crime News 
मराठवाडा

अल्पवयीन मुलीचा विनयभंग; आरोपीस पाच वर्षे सक्तमजुरी, दंडाची रक्कम पीडितेस देण्याचा न्यायालयाचा आदेश

सकाळ वृत्तसेवा

अंबाजोगाई (जि.बीड) : अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी आरोपी शेख सिराज शेख मुन्शी (रा.मियाभाई कॉलनी, अंबाजोगाई) यास बाललैंगिक अत्याचार संरक्षण कायदा अन्वये पाच वर्षे सक्तमजुरी व दहा हजार रुपये दंड, अॅट्रॉसिटी कलमानुसार एक वर्ष सक्तमजुरी व पाच हजार रुपये दंड अशी शिक्षा न्यायाधीश एम.बी.पटवारी यांनी गुरुवारी (ता.१८ ) ठोठावली. दंडाची रक्कम पीडितेस देण्याचा व शिक्षा एकत्र भोगण्याची आदेश न्यायालयाने दिला.


पीडित मुलगी (वय ९) वही आणण्यासाठी आरोपीच्या दुकानावर गेली असता दुकान बंद असल्याने आरोपीने पीडितेस दुसऱ्या दरवाज्यातून आत येण्यास सांगितले. त्यावेळी मुलगी वही घेत असता आरोपीने तिचा विनयभंग व लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर सदर घटना मुलीने मावशी व आजीला सांगितली. तिच्या आईने फिर्याद दिल्यावरून येथील शहर पोलिस ठाण्यात पोस्को अंतर्गत गुन्हा नोंद झाला. हे प्रकरण सुनावणीसाठी येथील सत्र न्यायालयात पाठविण्यात आले. या प्रकरणाची सुनावणी सत्र न्यायालयात झाली.

फिर्यादी पक्षाच्या वतीने एकूण सहा साक्षीदार तपासण्यात आले. आरोपीविरुद्ध गुन्हा सिद्ध झाल्यामुळे आरोपी शेख सिराज शेख मुन्शी यास पाच वर्षे सक्तमजुरी व दहा हजार रुपये दंड, बाल लैंगिक अत्याचार संरक्षण कायदा अन्वये पाच वर्षे सक्तमजुरी व दहा हजार रुपये दंड आणि एक वर्षे सक्तमजुरी आणि पाच हजार रुपये दंड अशी शिक्षा न्यायाधीश एम.बी. पटवारी यांनी ठोठावली.फिर्यादीच्या वतीने सरकारी वकील ॲड. रामेश्वर मन्मथअप्पा ढेले यांनी कामकाज पाहिले. या प्रकरणाचा तपास पोलिस उपअधीक्षक विशाल आनंद यांनी केला.

संपादन - गणेश पिटेकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain : महाराष्ट्रातून पाऊस गायब होणार? मोठ्या पावसाचा इशारा नाही

Latest Marathi News Live Update : गडचिरोलीत भयानक पाऊस; २४ तासांत ५० गावांचा संपर्क तुटला

भारताला LPG पुरवठा करणारा अमेरिका ठरला सर्वात मोठा देश; US अधिकारी म्हणाल्या, ‘एनर्जी सप्लायर बनल्याचा आनंद’

Pune University : पुणे विद्यापीठाचा विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! भोजनगृहाची दरवाढ रद्द, दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी

Akola News : अकोल्यात रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाइकांचा संताप; यज्ञा हॉस्पिटलची तोडफोड; डॉक्टरांनी आरोप फेटाळले

SCROLL FOR NEXT